शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जाती-धर्मभेद विसरून छत्रपती शिवरायांचे मावळे व्हा- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 18:40 IST

स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा करताना त्यांच्या सैन्यात सर्व जातीधर्माचे मावळे एकतेने नांदत होते. तसेच आपसातील सर्व जातीधर्माचे भेदभाव विसरून दलित मराठ्यांसह बहुजनांनी शिवरायांचे मावळे होण्याचा संकल्प करा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले .

नवी दिल्ली- स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा करताना त्यांच्या सैन्यात सर्व जातीधर्माचे मावळे एकतेने नांदत होते. तसेच आपसातील सर्व जातीधर्माचे भेदभाव विसरून दलित मराठ्यांसह बहुजनांनी शिवरायांचे मावळे होण्याचा संकल्प करा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले .आज शिवजन्मोत्सव सोहळा देशभरात मोठ्या दिमाखात साजरा होत असून दिल्लीतही मोठ्या उत्साहात साजरा झाला.भव्य दिव्य पुतळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी अभिवादन केले. याप्रसंगी पारंपरिक वेशभूषेत वस्त्र परिधान करून महाराष्ट्रातील मराठी समुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. विशेष करून अभिवादन रॅलीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून एकात्मता व सौहार्दतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा करून आदर्श राजा' शिवरायांची शिवशाही आजही सर्व भारतीयांना हवी आहे.शिवाजी महाराजांना सारखे शूर आणि महान व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र भूमीत जन्मले याचा आम्हाला अभिमान आहे. राष्ट्रनिर्माणाची मुहूर्तमेढ शिवाजी महाराजांनी जवळपास साडेतीनशे वर्षांपूर्वीच रोवली होती. शिवाजी महाराज आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिले आहेत, अशा शब्दांत छत्रपती शिवरायांचा गौरव ना. रामदास आठवलेंनी आपल्या भाषणात यावेळी केला.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले