शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Drug Case मध्ये मेहबुबा मुफ्तींचीही उडी; म्हणाल्या, "आडनाव खान म्हणूनच आर्यनला दिला जातोय त्रास"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 15:20 IST

Aryan Khan : आर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आल्या जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती.

ठळक मुद्देआर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आल्या जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती.

Cruise drugs case:  ड्रग्स प्रकरणी (Mumbai Drug Bust Case)  अटकेत असलेल्या आर्यन खानच्या (Aryan Khan) अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर बुधवार, १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पुन्हा एकदा त्याला आणि अरबाज मर्चेंटला ऑर्थर रोड तुरुंगात रहावं लागणार आहे. बुधवारी २.४५ वाजता या दोघांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, शाहरूख खानला (Shah Rukh khan) या प्रकरणी अनेक बॉलिवूडच्या दिग्गजांनी पाठिंबा दिला आहे. आता या प्रकरणी जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीदेखील उडी घेतली आहे. 

"चार शेतकऱ्यांच्या हत्याचा आरोपी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात कारवाई करण्याऐवजी केंद्रीय एजन्सी २३ वर्षांच्या मुलाला केवळ त्याचं नाव खान आहे म्हणून लक्ष्य करत आहे. व्होट बँकेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मुस्लिमांना लक्ष केलं जात आहे," असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं. 

जामीनासाठी अर्ज आर्यन खानच्या वकिलाकडून मुंबईच्या किला कोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, तो शुक्रवारी कोर्टाने फेटाळला. यामुळे आर्यनला शुक्रवारची रात्र इतर कैद्यासोबतच आर्थर रोड जेलमध्ये काढावी लागली. आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सतीश माने-शिंदे यांनी पुन्हा जामिनासाठी पुन्हा नवीन याचिका दाखल केली. मात्र, आता या जामीन अर्जावर १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार असल्याचं न्यायलयाने स्पष्ट केलं आहे. हा खटला आता विशेष एनडीपीएस कोर्टात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच एनसीबीनेदेखील उत्तर देण्यासाठी काही काळाचा अवधी मागितला आहे.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी