शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विमानात मोबाइल चेक करताना पत्नीला समजलं नव-याचं लफडं!पत्नीच्या गोंधळामुळे दोहा-बाली विमानाचं चेन्नईमध्ये लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 17:22 IST

दोहा येथून बालीला चाललेल्या कतार एअरवेजच्या विमानात नशेमध्ये तर्रर झालेल्या एका महिलेने मोठा गोंधळ घातल्याने ऐनवेळेला ते विमान चेन्नई विमानतळावर उतरवावे लागले.

ठळक मुद्देतिने नव-याचा हात स्कॅनरवर फिरवून मोबाइल ओपन केला.संतापाच्या भरात या महिलेने मद्यपान केले व विमानातच नव-याबरोबर हुज्जत घालायला सुरुवात केली.

चेन्नई - दोहा येथून बालीला चाललेल्या कतार एअरवेजच्या विमानात नशेमध्ये तर्रर झालेल्या एका महिलेने मोठा गोंधळ घातल्याने ऐनवेळेला ते विमान चेन्नई विमानतळावर उतरवावे लागले. रविवारी ही घटना घडली. गोंधळ घालणारी महिला इराणची नागरीक आहे. विमानामध्ये या महिलेने तिच्या नव-याचा मोबाइल चेक केला. त्यावेळी नवरा फसवणूक करत असल्याचे तिला समजले. त्यामुळे संतापाच्याभरात या महिलेने मद्यपान करुन विमानात गोंधळ घातला. या महिलेच्या शेजारच्या सीटवर तिचा नवरा डाराडूर झोपला होता. तिने वेळ घालवण्यासाठी म्हणून त्याचा मोबाइल घेतला. 

पण मोबाइल लॉक असल्याने ओपन होत नव्हता.  तिने नव-याचा हात स्कॅनरवर फिरवून मोबाइल ओपन केला. त्यावेळी नवरा आपली फसवणूक करत असल्याचे तिला समजले. संतापाच्या भरात या महिलेने मद्यपान केले व विमानातच नव-याबरोबर हुज्जत घालायला सुरुवात केली. विमानातील क्रू सदस्यांनी हस्तक्षेप करुन महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण महिला काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. 

अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कॅप्टनने विमान चेन्नई विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेतला. चेन्नई विमानतळावर इराणीयन जोडपे आणि त्यांच्या मुलाला विमानातून उतरवल्यानंतर विमानाने बालीच्या दिशेने प्रयाण केले. सुरक्षेचा मुद्दा नसल्याने चेन्नई विमानतळावर या जोडप्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

या महिलेची नशा उतरेपर्यंत तिला चेन्नई विमानतळावरच थांबवून ठेवण्यात आले. ही महिला पूर्ण शुद्धीत आल्यानंतर या कुटुंबाने कौलाल्मपूरचे फ्लाइट पकडले आणि तिथून ते दोहाला रवाना झाले.  प्रवाशाच्या गैरवर्तणूकीमुळे रविवारी सकाळी दहाच्या सुमारास कतार एअरवेजचे QR-962 दोहा-बाली विमान चेन्नईकडे वळवण्यात आल्याच्या वृत्ताला सीआयएसएफने दुजोरा दिला. भारतातल्या विमानतळांच्या संरक्षणाची जबाबदारी सीआयएसएफकडे आहे.  

टॅग्स :Airportविमानतळ