शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : सज्ज राहा, कोरोना संपलेला नाही; जगाला धडकी, भारत सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 05:38 IST

पंतप्रधानांनी घेतला आढावा

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू झपाट्याने वाढत आहेत. जगातही रुग्ण वाढू लागले आहेत. भारतात मात्र नव्या दैनंदिन रुग्णांची संख्या २००च्या आत असली तरीही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. कोरोना महामारी अजून संपलेली नाही. विमानतळांवर देखरेख ठेवण्याच्या उपाययोजना मजबूत करा. राज्यांनीही ऑक्सिजन पुरवठा व इतर बाबतीत सज्ज राहावे, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यात जागतिक परिस्थितीचा आढावा घेतला. 

‘बीएफ.७ वाढला नाही’पुणे : चीनमध्ये तर बीएफ.७ या नव्या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने भारताचीही चिंता वाढली आहे. तज्ज्ञांनी मात्र, त्याचे दाेन रुग्ण आपल्याकडे जुलै आणि ऑक्टाेबरमध्ये आढळून आले व ते बरेही झाले. त्याचा प्रसार इतर राज्यांत काेठेच झालेला नाही. म्हणजेच ताे व्हेरिएंट आपल्याकडे वाढू शकला नाही. आपल्याला सध्या त्याची काही भीती नाही; परंतु, आपण खबरदारी घेत आहाेत, असे राज्याचे साथराेग सर्वेक्षण अधिकारी डाॅ. प्रदीप आवटे म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले...कमजोर आणि वृद्धांसाठी बूस्टर डोसला प्रोत्साहन द्यावे. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा. सणासुदीच्या काळात गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला. राज्यांनी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांशी संबंधित सुविधा द्याव्या. 

राज्यात येणाऱ्या विमान प्रवाशांचे थर्मल टेस्टिंगनागपूर : कोरोनाबाबत राज्यात विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार विदेशातून राज्यात येणाऱ्या रॅन्डमली दोन टक्के विमान प्रवाशांचे सोमवारपासून विमानतळावर थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे.  विधानभवनात कोविड संदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. राज्यात लहान मुले व वृद्धांनी मास्क वापरावे. कोविड नियमांचे पालन करावे असे आवाहन सरकारने केले आहे. कोविडची पंचसूत्री लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्र