शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

गाडी दामटताना सावधान, थेट दहा वर्षे घडेल तुरुंगवारी; हीट अँड रन प्रकरणांसाठी कडक तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 06:23 IST

ब्रिटिशांनी अठराव्या शतकात केलेले तीन कायदे रद्द करून त्यांच्या जागी नवे कायदे लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : हिट अँड रन प्रकरणातील दोषीला दहा वर्षांपर्यंतच्या कारावासाची, तर बेदरकारपणे गाडी चालवून केलेल्या अपघातात लोक ठार झाले असल्यास त्यातील दोषीला सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद भारतीय न्यायसंहितेत करण्यात आली आहे.

ब्रिटिशांनी अठराव्या शतकात केलेले तीन कायदे रद्द करून त्यांच्या जागी नवे कायदे लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भारतीय दंडसंहितेऐवजी लागू होणाऱ्या भारतीय न्यायसंहितेच्या विधेयकात हिट अँड रन प्रकरणे व जीवघेण्या अपघातांबाबत या तरतुदी करण्यात आल्या आहेत. अपघात करणाऱ्या व नंतर पलायन केलेल्या, तसेच या अपघाताबद्दल पोलिसांना किंवा न्यायाधीशांना माहिती न देणाऱ्या वाहनचालकांना १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची व दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०४(२) मध्ये म्हटले आहे की, बेदरकारपणे वाहन चालवून धडक दिल्याने अपघातात जर कोणा व्यक्तीचा मृत्यू झाला असेल व तो चालक पळून गेला असल्यास या गुन्ह्यासाठी त्याला १० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRto officeआरटीओ ऑफीस