शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जात, धर्मावर बोलाल तर खबरदार; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांना दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 05:54 IST

काँग्रेस सदस्य रेवंत रेड्डी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान अर्थ मंत्रालयाशी संबंधित पूरक प्रश्न विचारताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या टिप्पणीवर जातीच्या संदर्भात काहीतरी बोलले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी काँग्रेस खासदाराच्या वक्तव्यावर आक्षेप घेत सदस्यांनी सभागृहात जात आणि धर्माच्या आधारावर चर्चा केल्यास कारवाई करावी लागेल, अशी तंबी दिली. 

काँग्रेस सदस्य रेवंत रेड्डी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान अर्थ मंत्रालयाशी संबंधित पूरक प्रश्न विचारताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या टिप्पणीवर जातीच्या संदर्भात काहीतरी बोलले होते. “सदस्य तेलंगणातून आले आहेत. त्यांची हिंदी कमकुवत असल्याचे ते सांगत आहेत. मीही कमकुवत हिंदीतच उत्तर देते,” असे निर्मला सीतारामन म्हणाल्यानंतर रेड्डी यांनी त्यावर आक्षेप घेऊन जातीवाचक उद्गार काढले. 

संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी काँग्रेस खासदाराच्या टीकेवर आक्षेप घेतला. नंतर बिर्ला यांनी कारवाईचा इशारा दिला. यावर रेड्डी यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला असता  अध्यक्ष म्हणाले, तुम्ही पुन्हा पुन्हा उठलात तर मी तुम्हाला सभागृहाबाहेर काढील. यानंतरही बराच वेळ वाद चालला. अखेर रेड्डी यांनी माघार घेतल्यानंतर प्रकरण शांत झाले.

डिंपल यादव यांनी घेतली सदस्यत्वाची शपथसमाजवादी पक्षाच्या (एसपी) नेत्या डिंपल यादव यांनी सोमवारी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. त्या उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. विरोधकांसाठी राखून ठेवलेल्या आसनाच्या अग्रभागी बसलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या पायालाही त्यांनी स्पर्श केला.

२,०००ची नोट म्हणजे काळा पैसाnबिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा सदस्य सुशील मोदी यांनी २००० रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सोमवारी राज्यसभेत मोदी म्हणाले की, १००पेक्षा अधिक रुपयांची नोट असेल तर या नोटांमध्ये काळा पैसा असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे २०००च्या नोटेवर बंदी घालावी. काळा पैसा, दहशतवादी फंडिंग, ड्रग्जची तस्करी आणि साठेबाजीसाठी दोन हजार रुपयांच्या नोटांचा वापर केला जात आहे. nकाळा पैसा थांबवायचा असेल तर दोन हजार रुपयांची नोट बंद करावी लागेल. अमेरिका, चीन, जर्मनी, जपान यासारख्या मोठ्या विकसित अर्थव्यवस्थांमध्येही १००च्या वर चलन नाही. त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून दोन हजारांच्या नोटेवर हळूहळू बंदी घालावी.

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत खासगी विधेयकपंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून त्याद्वारे निवडणूक आयुक्तांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी करणारे खासगी विधेयक काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी सोमवारी लोकसभेत चर्चेसाठी मांडले. उच्चस्तरीय समितीत विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचाही समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुकांसह सर्व राजकीय पक्षांच्या अंतर्गत कामकाजाचे नियमन, देखरेख  करण्यासाठी निवडणूक आयोगाला अधिक अधिकार देण्याचाही या विधेयकाचा प्रयत्न आहे. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाom birlaओम बिर्ला