शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Aadhar Card Fine: खबरदार! आधार कार्डचा दुरूपयोग केलात तर; होऊ शकतो 1 कोटीपर्यंत दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 06:22 IST

Aadhar Card Fine: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणास सरकारने दिले अधिकार. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणास दंडाचा अधिकार देण्यासाठी सरकारने ‘आधार व अन्य कायदा (सुधारणा) विधेयक २०१९’ मंजूर केले होते. त्यानुसार आता यासंबंधीची नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आधार कार्डचा दुरुपयोग करणाऱ्यांस आर्थिक दंड लावण्याचे अधिकार भारत सरकारने ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणास (यूआयडीएआय) दिले असून त्यानुसार, दुरुपयोगाच्या प्रकरणात प्राधिकरण दोषींना १ कोटी रुपयांपर्यंत दंड लावू शकते. 

दोन वर्षांपूर्वी यासंबंधीचा कायदा करण्यात आला होता. यासंबंधीची अधिसूचना केंद्र सरकारने २ नोव्हेंबर रोजी जारी केली आहे. ‘यूआयडीएआय (दंड निर्णय) नियमावली २०२१’ अनुसार, आता आधार कार्डचा दुरुपयोग झाल्यास, त्यासंबंधीची तक्रार प्राधिकरणाकडे दाखल करता येईल. त्यावर प्राधिकरण आर्थिक दंडाची कारवाई करू शकेल. हा दंड १ कोटी रुपयांपर्यंत असू शकेल. दंडास आव्हान देण्याचा अधिकार आरोपीस असेल. 

सूत्रांनी सांगितले की, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणास दंडाचा अधिकार देण्यासाठी सरकारने ‘आधार व अन्य कायदा (सुधारणा) विधेयक २०१९’ मंजूर केले होते. त्यानुसार आता यासंबंधीची नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमान्वये, प्राधिकरण एखाद्या अधिकाऱ्यास ‘प्रेझेंटिंग ऑफिसर’ म्हणून नेमू शकते. हा अधिकारी तक्रारीची छाननी करून प्रकरण निर्णय अधिकाऱ्यासमोर सादर करील. निर्णय अधिकारी दंड ठोठावण्याविषयीचा निर्णय घेईल. सध्या सीम कार्ड, पॅन कार्ड, प्राप्तिकर विवरणपत्र आदी अनेक बाबतीत आधार बंधनकारक करण्यात आले आहे. 

कारवाईसाठी नेमणार ‘निर्णय अधिकारी’दंडाची कारवाई करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून  निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल. निर्णय अधिकारी भारत सरकारच्या संयुक्त सचिव पदापेक्षा कमी दर्जाचा असणार नाही. निर्णय अधिकाऱ्याने ठोठावलेल्या दंडास दूरसंचार तक्रार निवारण व अपील न्यायाधिकरणाकडे आव्हान दिले जाऊ शकेल. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड