शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Heat Wave India: सावध रहा! 90 टक्के देश उष्णतेच्या डेंजर झोनमध्ये; एप्रिलचे अद्याप 10 दिवस बाकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 12:53 IST

नवी मुंबईतील महाराष्ट्र सरकारच्या पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने एकाचवेळी 13 जणांचा मृत्यू झाला होता. देशाच्या इतिहासातील आजवरच्या उष्णतेच्या लाटे-संबंधित घटनेतील मृत्यूची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. 

एप्रिल महिन्यात उष्णतेने कहर केला आहे. कधी दिवसभर तळपते उन तर कधी सायंकाळी पाऊस यामुळे लोक पुरते हैराण झाले आहेत. असे असताना एक धडकी भरवणारा रिपोर्ट आला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे भारताला उष्णतेच्या लाटेचा फटका जाणवू लागल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. देशातील ९० टक्के भाग उष्माघाताच्या डेंजर झोनमध्ये असल्याचे समोर आले आहे. 

उन खूप वाढलेय! उन्हाचा ताप कसा ओळखाल... शरीर देते हे संकेत... सावध रहा, लहान मुलांची, कुटुंबाची काळजी घ्या...केंब्रिज विश्वविद्यालयाच्या रामित देबनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केले आहे. कमलजीत रे, एसएस रे, आरके गिरी आणि एपी डिमरी या शास्त्रज्ञांसह पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम राजीवन यांनी लिहिलेल्या रिपोर्टनुसार उष्णतेच्या लाटेमुळे 50 वर्षांत भारतात 17,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 1971 ते 2019 या काळात देशात उष्णतेच्या लाटेच्या 706 घटना घडल्याचे म्हटले आहे.

नवी मुंबईतील महाराष्ट्र सरकारच्या पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने एकाचवेळी 13 जणांचा मृत्यू झाला होता. देशाच्या इतिहासातील आजवरच्या उष्णतेच्या लाटे-संबंधित घटनेतील मृत्यूची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. 

उष्णतेची लाट केव्हा घोषित करतात...उष्णतेची लाट असल्याचे घोषित करण्यासाठी काही अटी आहेत. मैदानी भागात कमाल तापमान किमान 40 डिग्री सेल्सिअस, किनारपट्टीच्या भागात किमान 37 डिग्री सेल्सिअस आणि डोंगराळ भागात किमान 30 डिग्री सेल्सिअस असेल आणि सरासरीपेक्षा हे तापमान किमान 4.5 डिग्री सेल्सिअसने जास्त असेल तर उष्णतेची लाट म्हणून घोषित केले जाते. 

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघाताचा कहर, तुम्हालाही त्रास होऊ शकतो...कशी काळजी घ्याल... 

1901 पासून भारतात उष्णतेशी संबंधीत माहिती ठेवली जाते. तेव्हापासून आजवर यंदाचा फेब्रुवारी सर्वात उष्ण महिना ठरला आहे. मार्चमध्ये पावसाने हजेरी लावल्याने उष्णता नियंत्रणात राहिली होती. परंतू, यंदाचा एप्रिल तेव्हापासून आजपर्यंतचा सर्वात उष्ण ठरलेला तिसरा महिना आहे. अद्याप एप्रिलचे 10 दिवस बाकी आहेत. 

टॅग्स :Heat Strokeउष्माघात