शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही हक्क हिरावले जाऊ नयेत यासाठी सजग राहा - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 05:35 IST

लोकसभा निवडणुकांत मोठा विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर महिनाभराने नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम रविवारी पुन्हा सुरु झाला.

नवी दिल्ली : लोकशाहीला कोणीही गृहित धरू नये. जोपर्यंत लोकशाही हक्क हिरावून घेतले जात नाहीत तोपर्यंत त्यांचे महत्त्व कोणालाही कळत नाही. आपल्या हक्कांवर कोणी गदा आणणार नाही यासाठी जनतेने सजग राहायला हवे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकांत मोठा विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर महिनाभराने नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम रविवारी पुन्हा सुरु झाला. त्यात ते म्हणाले की, १९७७ साली तत्कालीन केंद्र सरकारने आणीबाणी लादून लोकांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणली होती. लोकशाही प्रत्येक नागरिकाचा आदर करणे आवश्यक आहे. नेमके तेच त्या काळात झाले नव्हते.

लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात मोदी यांनी केदारनाथ येथील गुंफेत जाऊन ध्यानधारणा केली होती. त्याबद्दल ते म्हणाले की, तो काही राजकीय दौरा नव्हता तर स्वत:चे आत्मपरीक्षण करण्यासाठी केलेली ती कृती होती. लोकसभा निवडणुकांच्या आधी फेब्रुवारी महिन्यात प्रसारित झालेल्या मन की बातच्या शेवटच्या भागाचा प्रचारासाठी उपयोग केल्याच्या आरोपाचाही मोदी यांनी इन्कार केला. त्यांनी सांगितले की, मन की बातद्वारे जनतेशी संवाद साधायला पुन्हा येईन असे मी त्या भागात म्हटले होते. अतिआत्मविश्वासापायी मी असे उद्गार काढल्याची टीका विरोधकांनी केली होती. जनतेने विश्वास दाखविला नसता तर मी पुन्हा पंतप्रधान होऊ शकलो नसतो.

पाणी वाचविण्यासाठी तीन आवाहनेमन की बात कार्यक्रमात मोदी यांनी जनतेला तीन आवाहने केली. स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर पाण्याचा एक एक थेंब वाचविण्यासाठी लोकचळवळ उभारावी, पाणी वाचविण्यासाठी पारंपारिक ज्ञान सर्वांना प्रदान करावे तसेच पाणी वाचविण्यासाठी काम करणाºया व्यक्ती व संस्थांची माहिती सरकारला कळवावी असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. पाणी वाचवा मोहिमेसाठी जनशक्ती व जलशक्ती ही टिष्ट्वटरहँडल वापरता येतील. केंद्र सरकारने स्वतंत्र जलमंत्रालयाची स्थापना केली असली तरी ही मोहिम जनतेच्या सक्रिय सहभागामुळेच यशस्वी होऊ शकते असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात