शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

Coronavirus :"कोरोनाविरुद्धची लढाई हा लोकांनी चालविलेला महायज्ञ"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 06:18 IST

लढाईत जनता आघाडीवर आहे व सरकार आणि प्रशासन तिला साथ देत आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कृतनिश्चयाबद्दल देशवासीयांचे रविवारी कृतज्ञतापूर्वक आभार मानले.

नवी दिल्ली : देश सध्या लढत असलेली कोरोनाविरुद्धची लढाई हा खऱ्या अर्थी लोकांनी हाती घेतलेला महायज्ञ आहे व प्रत्येक नागरिक यात आपल्या कुवतीनुसार आहुती देत आहे. लढाईत जनता आघाडीवर आहे व सरकार आणि प्रशासन तिला साथ देत आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कृतनिश्चयाबद्दल देशवासीयांचे रविवारी कृतज्ञतापूर्वक आभार मानले.‘आकाशवाणी’वरून ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, गरिबीशी दोन हात करणाºया व विकासाची आंस ठेवून मार्गक्रमण करणाºया भारतासारख्या देशापुढे अशा प्रकारची लढाई लढण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. देशातील प्रत्येक नागरिक या लढाईत शिपाई म्हणून व सेनानी म्हणून सामील झाला, हे देशाचे मोठे भाग्य आहे. इतिहासात या अभूतपूर्व लढाईची नक्कीच गौरवाने नोंद केली जाईल. मोदी म्हणाले की, प्रत्येक कठीण परिस्थिती, प्रत्येक लढाई आपल्याला काही तरी नवे धडे देते, काही नव्या शक्यतांचे मार्ग प्रशस्त करते व काही नव्या उद्दिष्टांचेही संकेत देते. आताच्या अडचणीच्या काळात देशवासीयांनी दाखविलेल्या दृृढनिश्चयाने देशात काही नव्या बदलांनाही सुरुवात झाली आहे. उद्योग, कार्यालये, शिक्षण संस्था व वैद्यकीय क्षेत्र काही तरी नवे करण्यास, नवे मार्ग शोधण्यास आतुर झाले आहे. सर्वांनी एखादी गोष्ट एकदिलाने करायची म्हटले की, काय केले जाऊ शकते, याचा अनुभव आपण सर्वच घेत आहोत.पंतप्रधान म्हणाले की, सध्याच्या ‘लॉकडाऊन’ने आपल्याला समाजाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली आहे. एरवी ज्यांची आपण दखलही घेत नाही, अशा लहान-सहान लोकांच्या उपयुक्ततेचे महत्त्व आपल्याला पटले आहे. त्यातूनच आपले हात इतरांना मदत करण्यासाठी पुढे जात आहेत व आपल्या मनात करुणा आणि ममत्वाची भावना जागृत झाली आहे.आताच्या या महामारीच्या निमित्ताने आयुर्वेदाची महती पटवून देण्याची गरज प्रतिपादित करून मोदी म्हणाले की, जगाने योगाचा जसा सहर्ष स्वीकार केला तसाच आयुर्वेदाचाही नक्की स्वीकार केला जाईल. यासाठी तरुण पिढीला कंबर कसावी लागेल. जगाला एखादी गोष्ट पुराव्याने सिद्ध केल्यावरच पटत असेल तर आपल्याला ती त्या पद्धतीने पटवून द्यावी लागेल.>फालतू आत्मविश्वास नकोआग, कर्ज आणि आजारपण यांना कमी लेखले तर ते दुपटीने आपल्यावर उलटतात या अर्थाचा एक संस्कृत श्लोक उद््धृत करून मोदी म्हणाले की, कोरोना माझ्यापर्यंत, माझ्या गल्ली-मोहल्ल्यापर्यंत येऊच शकत नाही, अशा फालतू आत्मविश्वासात कोणीही राहू नये.‘लॉकडाउन’ने समाजाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली आहे. एरवी ज्यांची आपण दखलही घेत नाही, अशा लहान-सहान लोकांच्या उपयुक्ततेचे महत्त्व आपल्याला पटले आहे. इतरांना मदत करण्यासाठी पुढे जात आहेत व आपल्या मनात ममत्व जागे झाले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या