शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Bathinda Military Station Attack: जवानांवरील हल्ल्याची जबाबदारी ‘सीख फॉर जस्टिस’ने स्वीकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 07:19 IST

Bathinda Military Station Attack: पंजाबमधील भटिंडा येथील लष्करी तळावर बुधवारी पहाटे झालेल्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला होता. या चार जवानांच्या हत्येची जबाबदारी सीख फॉर जस्टिस (एसएफजे) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

चंडीगड : पंजाबमधील भटिंडा येथील लष्करी तळावर बुधवारी पहाटे झालेल्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला होता. या चार जवानांच्या हत्येची जबाबदारी सीख फॉर जस्टिस (एसएफजे) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. गुरपटवंतसिंग पन्नू हा एसएफजेचा प्रमुख आहे. छावणी परिसरात राहणाऱ्या व्यक्तीनेच गोळीबार केला असावा अशी शक्यता सैन्य व पोलिसांच्या तपास पथकाने व्यक्त केली आहे. पहाटे साडेचार वाजता गोळीबार झाला होता. तीन दिवस उलटून गेले तरी हल्लेखोरांचा शोध सुरूच आहे. भटिंडा छावणी परिसरात राहणारे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांची मोजणी केली जात आहे. जेणेकरून, हे समजू शकेल की, या घटनेनंतर कोणी जवान बेपत्ता तर नाही.

जवान झोपेत असताना गोळीबारहल्लेखोर दोघे होते, असे तपासादरम्यान समोर आले आहे. एकाच्या हातात रिव्हॉल्व्हर तर दुसऱ्याच्या हातात कुऱ्हाड होती. जवान गाढ झोपेत असताना त्यांना गोळ्या मारण्यात आल्या. भटिंडा छावणी पोलिसांनी याप्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध खून आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्या इन्सास रायफलमधून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, ती काही दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. या रायफलचा फॉरेन्सिक अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

तपास सुरूलष्कराच्या अधिकाऱ्यांना असे वाटत आहे की, परस्पर वैरातून ही घटना घडली असावी. त्यादृष्टीने तपासही केला जात आहे. शहीद जवानांच्या शरीरावर कोणत्याही धारदार शस्त्राच्या, जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. 

टॅग्स :PunjabपंजाबTerror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान