शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 19:30 IST

Bastar Encounter: छत्तीसगडमध्ये नक्षलवादाविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.

Bastar Encounter :छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सध्या परिसरात चकमक सुरू असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल झाली आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून शस्त्रे-दारुगोळा जप्त करण्यात आली आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर माड भागात नक्षलवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून नारायणपूर पोलिस आणि दंतेवाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. यावेळी चकमक झाली आणि त्यात 24 नक्षलवादी ठार झाले. दंतेवाडाचे एसपी गौरव राय यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

त्यांनी सांगितले की, दुपारी एकच्या सुमारास सुरक्षा दल नक्षलवाद्यांच्या ठिकाणावर पोहोचताच त्यांनी (नक्षलवाद्यांनी) गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. या चकमकीत सर्व जवान सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या चकमकीदरम्यान, सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा तळही उद्ध्वस्त केला आहे.

आतापर्यंत 181 नक्षलवादी ठार छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दल सातत्याने कारवाई करत आहेत. ज्या नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात यायचे आहे, त्यांनाही विशेष ऑपरेशन अंतर्गत परत येण्याची संधी दिली जात आहे. एवढे प्रयत्न करूनही जे नक्षलवादाचा मार्ग सोडत नाहीत, त्यांचा खात्मा केला जात आहे. विशेष म्हणजे, दंतेवाडा आणि नारायणपूरसह सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर प्रदेशात आतापर्यंत सुरक्षा दलांनी 181 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. वेगवेगळ्या चकमकीत त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. 

अमित शाहांचा नक्षलवादावर प्रहारविशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑगस्ट महिन्यात एका कार्यक्रमात बोलताना नक्षलवादाचा नायनाट करण्याबाबत मोठे वक्तव्य केले होते. भारत मार्च 2026 पर्यंत डाव्यांच्या कट्टरवादापासून मुक्त होईल. या धोक्याविरुद्ध अखेरची लढाई सुरू करण्यासाठी मजबूत रणनीती आवश्यक आहे, असे शाह म्हणाले होते. एवढेच नाही, तर त्यांनी नक्षलवाद्यांना हिंसाचार सोडण्याचे आवाहनही केले. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगडAmit Shahअमित शाह