शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बसवेश्वरांची जयंतीही राजकीयच; भाजपा व काँग्रेसमध्ये चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:11 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाची मते मिळवण्यासाठी काँग्रेस व भाजपाची जोरदार धावपळ सुरू असून, जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे नेते व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेही त्यात मागे नाहीत.

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाची मते मिळवण्यासाठी काँग्रेस व भाजपाची जोरदार धावपळ सुरू असून, जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे नेते व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेही त्यात मागे नाहीत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा हे लिंगायत असले, तरी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म व धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा देऊ न काँग्रेसने त्यांच्यापुढेच मोठे आव्हान निर्माण केले आहे.लिंगायत समाजास स्वतंत्र धर्माची मान्यता देणे भाजपाला मान्य नाही. तो समाज हिंदू धर्माचा भाग आहे, अशीच भाजपाची भूमिका आहे, पण प्रत्यक्षात स्वतंत्र धर्माची मागणी लिंगायत समाजानेच केली होती. आता त्या विरोधात भूमिका घेतल्याने भाजपाची अडचण झाली आहे. लिंगायत समाजाचे प्रमाण १७ ते २0 टक्क्यांदरम्यान असून, त्यावर सर्वांचा डोळा आहे. आतापर्यंत ती भाजपाला मिळत होती, याचे कारण येडियुरप्पा. मात्र, स्वत: कुरबा समाजातील सिद्धरामय्या यांनी ती मते आपल्याकडे यावीत, या दृष्टीने पावले टाकली. विधानसभेत लिंगायत आमदारांची संख्या १00 हून अधिक असून, त्यापैकी ५0 काँग्रेसचे व तितकेच भाजपाचेही आहेत. एकूण २२८ आमदारांच्या विधानसभेत सर्वाधिक आमदार या समाजाचे असल्यानेच ती मते सर्वांना हवी आहेत.तरुणांना अटकलिंगायत व वीरशैव समाजाला धार्मिक अल्पसंख्य दर्जा देण्याबाबत भाजपाची भूमिका काय आहे, हे जाहीर करा, असे सांगण्यासाठी अमित शहा यांच्यापाशी जाऊ पाहणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. हे तरुण आज विधान भवनापाशी निघाले होते. बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यासाठी अमित शहा येणार असल्याने त्यांना जाब विचारण्याचे लिंगायत तरुणांनी ठरविले होते.

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपा