वय 17 वर्षे... वडिलांची एकुलती एक लेक; आलिशान जीवनाचा त्याग करत 'ती' घेणार संन्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 10:16 AM2023-09-05T10:16:47+5:302023-09-05T10:30:10+5:30
जिया शाह ही तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी ती 6 डिसेंबर रोजी संन्यासाचा मार्ग स्वीकारणार आहे.
एकीकडे लाखो तरुण दिवसातील अनेक तास इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर घालवत आहेत. असे काही लोक आहेत जे त्यांच्या लहान वयात असे काम करतात जे सर्वांनाच थक्क करतात, अशीच एक घटना समोर आली आहे. जिया शाह ही तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी ती 6 डिसेंबर रोजी संन्यासाचा मार्ग स्वीकारणार आहे.
जिया शाह केवळ 17 वर्षांची असून ती सांसारिक जीवनाचा निरोप घेऊन संयमाचा मार्ग स्वीकारणार आहे. बाडमेरमध्ये जिया शाहच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मोठी गर्दी जमली. जिया शाहने सांगितले की, जैन समाजात संयमाचा मार्ग सर्वात पवित्र मानला जातो. दोन वर्षांपूर्वी तिच्या मनात भक्तीची भावना होती आणि शंखेश्वर दादांच्या दर्शनानंतर या भावना प्रबळ झाल्या.
जियाने स्वतःच्या दीक्षेसाठी जेव्हा वडील कल्पेश भाई यांना सांगितलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. आई झँखना शाहने एकुलत्या एक मुलीला संयमाचा मार्ग स्वीकारण्याची परवानगी दिली, तो दिवस जियासाठी सर्वात संस्मरणीय होता. 20 ऑगस्ट रोजी गुजरातमधील पालीताना येथे गुरुदेव श्रेयांस प्रभ सुरीश्वर म.सा आणि गुरुवर्य साध्वी श्री प्रशम निधी म.सा. यांनी तिच्या दीक्षेची तारीख निश्चित केली.
जिया सांगते की, 6 डिसेंबरनंतर तिचे कपडे, तिची राहणी, तिची जीवनशैली आणि अगदी तिचे नातेसंबंध बदलतील, पण धर्माबद्दलची तिची भावना बदलणार नाही. ती सांगते की, आदर आणि समर्पणामुळे ती पांढरे कपडे परिधान करेल. जियाची दीक्षा 6 डिसेंबर रोजी पालीताना, गुजरात येथे गुरुदेव श्रेयांस प्रभ सुरीश्वर म. सा यांच्याकडून संपन्न होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.