शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

लाचखाऊ डॉक्टरांची नाडी आता ‘आयएमसी’च्या हाती

By admin | Updated: November 19, 2014 04:44 IST

परदेशी सहली, मुलांचे शिक्षण, फ्लॅट आणि मर्सडिज गाडीपर्यंतची लाच ‘भेट’ म्हणून औषध कंपन्यांकडून घेऊन विलासी जीवन जगणारे महाराष्ट्रातील दहा डॉक्टर इंडियन मेडिकल कौन्सीलच्या (आयएमसी) हाती लागले आहेत

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीपरदेशी सहली, मुलांचे शिक्षण, फ्लॅट आणि मर्सडिज गाडीपर्यंतची लाच ‘भेट’ म्हणून औषध कंपन्यांकडून घेऊन विलासी जीवन जगणारे महाराष्ट्रातील दहा डॉक्टर इंडियन मेडिकल कौन्सीलच्या (आयएमसी) हाती लागले आहेत. देशभरातील ३२६ भ्रष्ट डॉक्टरांच्या यादीत राज्यातील या डॉक्टरांचा समावेश असून,त्यातील सात डॉक्टरांना आयएमसीच्या १३ सदस्यीय नीतिमत्ता समितीपुढे उभे राहावे लागल्याने या डॉक्टरांना घाम फुटला आहे. केंद्र सरकारच्या आदेशावरून कौन्सीलने लाच प्रकरण गंभीरपणे घेतले असून, या आरोपांत तथ्य आढळल्यास या डॉक्टरांवर फौजदारी करण्यापासून मान्यता रद्द करेपर्यंत सारेच इलाज केले जाणार आहेत. दिल्लात दोन दिवस सुरू असलेल्या चौकशीत देशातील ३२६ पैकी दीडशे डॉक्टर हजर झाले. राज्यातील सात डॉक्टरांनी आपले म्हणणे सादर केले. इतरांना डिसेंबरमध्ये बोलविण्यात आले आहे. गुजरातेतील अहमदाबादच्या एका औषध कंपनीने आपली महागडी औषधे डॉक्टरांनी रूग्णाला द्यावी यासाठी डॉक्टरांना बंगला, परदेशी सहल, आलीशान मोटारी, फ्लॅट्स, डॉक्टरांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च यासोबत काही डॉक्टरांना रोख स्वरूपात पैसाही पुरविल्याचा आरोप एका सामाजिक संस्थेने करून, या डॉक्टरांबाबतचे पुरावे सरकारला सादर केले. चार वर्षांपूर्वी काही लाखांवरून सुरू झालेल्या या कंपनीची सध्याची उलाढाल पाचशे कोटींची आहे. समितीचे एक सदस्य व महाराष्ट्र मेडिकल कौन्सीलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की डॉक्टरांनी आदर्श पेशाच्या नावाखाली सुरू केलेला काळा धंदा लोकांपुढे आहेच पण पुरावे सापडत नव्हते. आरोप असलेल्या सर्वच डॉक्टरांचा गैरकृत्यात समावेश असेल असे सांगता येत नाही, पण पुढे आलेली कागदपत्रे व पुरावे महाभंयकर स्थिती असल्याने कौन्सीलने हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. कुणावर उगीच आरोप केले असतील तर त्यांचा बचावही करू, असे त्यांनी स्पष्ट केले. किंबहुना अजून आरोप सिद्ध व्हायचे आहेत,या कारणास्तव त्यांनी यादीतील नावे उघड करण्यास नकार दिला.