शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! जनधन योजनेचा बट्याबोळ; 300हून अधिक एटीएम कार्ड नाल्यात सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 15:15 IST

राजस्थानमधल्या बारां जिल्ह्यातील छबडा भागात बुधवारी एका नाल्यामध्ये 300हून अधिक बँक एटीएम कार्ड सापडली आहेत.

बारां- राजस्थानमधल्या बारां जिल्ह्यातील छबडा भागात बुधवारी एका नाल्यामध्ये 300हून अधिक बँक एटीएम कार्ड सापडली आहेत. या घटनेनंतर क्षेत्रीय ग्रामीण बँक प्रशासनात खळबळ उडाली. गावातल्या गरिबांना बँकेशी जोडण्यासाठी पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत बँक खाती उघडण्यात आली. ही कार्ड्स ग्रामीण भागातल्या गरिबांपर्यंत पोहोचवायची होती. 2016 रोजी जारी करण्यात आलेली ही कार्ड्स बँक खातेधारकांपर्यंत द्यायची होती. परंतु बँक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तसं होऊ शकलं नाही.  जनधन योजनेंतर्गत खातं उघडल्यानंतर छबडातल्या बडोदा राजस्थान क्षेत्रीय ग्रामीण बँकेनं तीन वर्षं होऊन अद्याप एटीएम कार्ड पुरवली नव्हती. विशेष म्हणजे तीच कार्ड्स आता नाल्यात सापडली आहेत. एका वाटसरूनं जेव्हा बंद लिफाफ्यातील ही एटीएम कार्ड्स नाल्यात पडलेली पाहिली, तेव्हा लागलीच त्याची सूचना बँक अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर बँक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि नाल्यात पडलेली सर्व एटीएम कार्ड बँकेत घेऊन गेले.मिळालेल्या माहितीनुसार, बडोदा राजस्थान क्षेत्रीय ग्रामीण बँकेतील सर्व एटीएम कार्ड थेट ग्राहकांकडे जाण्याऐवजी पहिल्यांदा बँकेत जातात. बँकेतून ग्राहकांना एटीएम कार्डांचं वितरण केलं जातं. परंतु नाल्यात एटीएम कार्ड सापडणं ही बँकेचा हलगर्जीपणा असल्याची चर्चा आहे. बँक मॅनेजर गुलाबचंद बैरवा यांच्या मते तीन वर्षांपूर्वीच ही एटीएम कार्ड्स वाटण्यासाठी पाठवण्यात आली होती. परंतु त्यातील काही खाती बंद झाली, तर काही ब्लॉक झाल्यानं वाटण्यात आली नाहीत. ज्या व्यक्तीकडे एटीएम कार्ड वाटण्याची जबाबदारी देण्यात आली होती, परंतु ती त्याच्याजवळच होती. सामान शिफ्ट करण्याच्या नादात ती कार्ड निष्काळजीपणे नाल्यात पडल्याची समोर आली आहे.