शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: समाजवादीचे ज्येष्ठ दिवंगत नेते बेनी प्रसाद वर्मा यांच्या मुलाचा कोरोना संसर्गानं मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 15:15 IST

CoronaVirus News: जेव्हा ते किडनीच्या नियमित तपासणीसाठी दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात पोहोचले, तेव्हा पुन्हा तपासणी केली गेली. त्यावेळी ते पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.

नवी दिल्लीः समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बेनी प्रसाद वर्मा यांच्या मोठ्या मुलाचे मंगळवारी दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात कोरोना संसर्गामुळे निधन झाले. बेनी प्रसाद वर्मा यांचा मुलगा दिनेश वर्मा यांच्यावर एस्कॉर्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. दिनेश वर्मा यांच्या निधनाने बेनी प्रसाद वर्मा कुटुंब व जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. दिनेश वर्मा यांना किडनीच्या आजाराने ग्रासले होते. अलीकडेच कोरोना संसर्ग झाल्यावर त्यांना लखनऊच्या केजीएमयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथून ते बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. जेव्हा ते किडनीच्या नियमित तपासणीसाठी दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात पोहोचले, तेव्हा पुन्हा तपासणी केली गेली. त्यावेळी ते पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.मिळालेल्या माहितीनुसार, बेनीप्रसाद वर्मा यांचा मुलगा दिनेश वर्मा हे स्टोरेज कॉर्पोरेशनमध्ये काम करत होते. त्यांना मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्येनं ग्रासलं होतं, तसेच ते बराच काळ उपचार घेत होते. 2007मध्ये त्यांनी किडनी प्रत्यारोपणही केले. त्यांच्या आईने त्यांना एक मूत्रपिंड दान केले होते. ते आपल्या उपचारासाठी वेळोवेळी दिल्लीत जात असत. लखनऊमध्ये दिनेश वर्मा यांचा तपास अहवाल पहिल्यांदा पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, तिथे उपचारानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. पण किडनीच्या आजारावर उपचार सुरू असल्यानं त्यांना दिल्ली एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल केले गेले. पण तिथे त्यांचा कोरोनाचा नमुना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि मंगळवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.वडील बेनी प्रसाद वर्मा यांचा लॉकडाऊनमध्ये मृत्यू विशेष म्हणजे लॉकडाऊनदरम्यान बेनी प्रसाद वर्मा यांचेही 27 मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. बेनी प्रसाद वर्मा हे समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि देशातील दिग्गज नेते होते. बेनी प्रसाद वर्मा हे समाजवादी पक्षाचे राज्यसभेचे खासदार होते. बेनी प्रसाद वर्मा यांना उत्तर प्रदेशातील कुर्मी समुदायाचा सर्वात स्वीकारलेला नेता मानला जात असे. यूपीए 2 सरकारमध्ये बेनी प्रसाद वर्मा केंद्रीय पोलादमंत्री होते. ते सपाचे संस्थापक मुलायम सिंग यांचे निकटचे मानले जात होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस