शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

केरळमधील नगरपालिकेवर फडकवला जय श्रीराम उल्लेख असलेला बॅनर, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 11:29 IST

Kerala BJP News : भाजपाने विजय मिळवलेल्या पलक्कड नगरपालिकेच्या कार्यालयावर कार्यकर्त्यांनी जय श्रीराम लिहिलेला बॅनर लावल्याने खळबळ उडाली असून, पालिका सचिवांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देयावेळच्या केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने चांगली कामगिरी केली आहेकेरळमधील पलक्कड नगरपालिकेसह दोन नगरपालिकांमध्ये भाजपाने विजय मिळवला आहेतर सुमारे २४ हून ग्रामपंचायतींमध्येही सत्ता मिळवली आहे

पलक्कड (केरळ) - नुकत्याच झालेल्या केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने समाधानकारक कामगिरी केली आहे. दरम्यान, भाजपाने विजय मिळवलेल्या पलक्कड नगरपालिकेच्या कार्यालयावर कार्यकर्त्यांनी जय श्रीराम लिहिलेला बॅनर लावल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर वादाला तोंड फुटले असून, पालिका सचिवांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी नगरपालिकेमध्ये भाजपाला विजय मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यासा सुरुवात केली. या दरम्यान, काही कार्यकर्ते पलक्कड नगरपालिकेच्या इमारतीवर चढले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांचे छायाचित्र असलेला पोस्टर लावला. त्यावर जय श्रीराम असे लिहिले.त्यानंतर नगरपालिकेच्या सचिवांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आम्ही काल रात्री भादंवि. कलम यू/एस १५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सुरू झाला आहे आणि हा बॅनर लावणाऱ्या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.यावेळच्या केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने चांगली कामगिरी केली आहे. केरळमधील पलक्कड नगरपालिकेसह दोन नगरपालिकांमध्ये भाजपाने विजय मिळवला आहे. तर सुमारे २४ हून ग्रामपंचायतींमध्येही सत्ता मिळवली आहे.

टॅग्स :KeralaकेरळBJPभाजपाPoliticsराजकारण