शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षात बँकांचे १.७६ लाख कोटी रुपये बुडाले, नोटबंदीनंतर बँकांची वाताहत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 14:58 IST

नोटबंदीनंतर बँकांकडून कोट्यवधींची कर्ज माफ

नवी दिल्ली: गेल्या तीन वर्षात भारतीय बँकांनी तब्बल १.७६ लाख कोटी रुपये गमावले आहेत. शंभर कोटींपेक्षा अधिकचं कर्ज बुडवणाऱ्या ४१६ खातेधारकांची माहिती नुकतीच समोर आली आहे. या व्यक्तींनी बुडवलेल्या कर्जाची सरासरी रक्कम ४२४ कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात बँकांनी दिलेलं कर्ज बुडित खात्यात गेलं आहे. मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन ते बुडवणाऱ्या व्यक्तींचा आकडा पहिल्यांदाच समोर आला आहे. शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम बुडवणाऱ्या खातेधारकांची माहिती जाहीर करण्याच्या सूचना आरबीआयनं बँकांना दिल्या होत्या. त्यानंतर याबद्दलची आकडेवारी 'सीएनएन-न्यूज१८'नं माहिती अधिकारातून समोर आणली आहे. २०१४-१५ पासून सरकारी आणि खासगी बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्जमाफी करण्यात आल्याची आकडेवारी यात आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीत देशातील शेड्युल्ड कमर्शियल बँकांनी एकूण २.१७ कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत बँकांनी ६९,९७६ कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं होतं. यानंतर ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. नोटबंदीनंतरच्या दोन वर्षांमध्ये माफ करण्यात आलेल्या कर्जाचा आकडा थेट १,२७,७९७ कोटींवर जाऊन पोहोचला. म्हणजेच नोटाबंदीनंतर बँकांचं बुडित खात्यात गेलेलं कर्ज तब्बल ८३ टक्क्यांनी वाढलं. यानंतरही बँकांचं कर्ज बुडवणाऱ्यांची संख्या वाढतच गेली. त्यामुळे बुडित खात्यात गेलेली रक्कम १.२७ लाख कोटी रुपयांवरुन २.१७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली.  

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक