शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

महामार्ग बांधणीच्या रथाला बँकांच्या नकाराचा अडसर

By admin | Updated: May 8, 2017 05:11 IST

केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचा महामार्ग बांधणीचा वेगवान रथ आता बँकांनी अडवला आहे. बँकांनी कर्जपुरवठा करण्यास

सुरेश भटेवरा/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचा महामार्ग बांधणीचा वेगवान रथ आता बँकांनी अडवला आहे. बँकांनी कर्जपुरवठा करण्यास नकार दिल्याने, महामार्ग बांधणीच्या सुमारे ३० प्रकल्पांचे काम टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊनही सुरू होऊ शकलेले नाही. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ डिसेंबर २0१५ रोजी भूमिपूजन करण्यात आलेल्या दिल्ली मेरठ एक्स्प्रेस-वेच्या दोन टप्प्यांचाही समावेश आहे. कर्जपुरवठा रोखणाऱ्या बँका म्हणतात, आर्थिकदृष्ट्या हे महामार्ग प्रकल्प व्यवहार्य नाहीत, कारण प्रकल्प उभारणाऱ्या खाजगी कंपन्या प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही कर्जाची परतफेड करू शकतील की नाही, याविषयी बँकांना शंका आहे. बँकांच्या दृष्टिने या प्रकल्पांचे आर्थिक गणित (फायनान्शिअल क्लोजर) भंरवशाचे नाही. साहजिकच बुडित कर्जांच्या (एनपीए) ओझ्याखाली अगोदरच दबलेल्या बँका महामार्ग प्रकल्पांना कर्ज पुरवून नवा धोका पत्करायला तयार नाहीत.दिल्लीत झालेल्या एका बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांनी महामार्ग बांधणीच्या ६७ कामांविषयी सद्यस्थितीचे सादरीकरण मंत्री गडकरी यांच्यासमोर केले. यापैकी २२४३ कि.मी. अंतराच्या ३0 प्रकल्पांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होऊनही बँकांना ‘फायनान्शिअल क्लोजर’ विषयी समाधान नसल्याने हे प्रकल्प अडकून पडले आहेत, असे सांगण्यात आले. यापैकी बहुतांश महामार्ग हे ‘हायब्रिड अ‍ॅन्युईटी मॉडेलनु’सार बांधण्यात येणार आहेत.महामार्ग बांधणीच्या प्रकल्प उभारणीत सहभागी एका कंपनीच्या अभियंत्याने नाव जाहीर न करण्याच्या शर्तीवर सांगीतले की प्रकल्पांचे ‘फायनान्शिअल क्लोजर’ न होण्यास मुख्यत्वे बँकांच जबाबदार आहेत. एनपीएच्या भीतीमुळे बँकांचे अधिकारी कर्जपुरवठा करायला तयार नाहीत. त्यांना वाटते की हे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाहीत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही खाजगी कंपन्यांना त्यातून कर्जांची परतफेड करता येईल एवढा पैसा मिळेल, असे बँकांना वाटत नाही.पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दिल्ली मेरठ या महत्वाकांक्षी महामार्ग बांधणीच्या कामाचे भूमिपूजन ३१ डिसेंबर २0१५ रोजी करण्यात आले होते. या महामार्गाच्या उभारणीचे काम तीन टप्प्यात होणार आहे. तथापि ‘एनएचएआय’च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यक्षात ३ पैकी एकाच टप्प्याचे कामच गेल्या दिड वर्षात सुरू होऊ शकले आहे. देशात २२४३ कि.मी. अंतराचे आणखी २९ प्रकल्प बँकांनी कर्जपुरवठयास नकार दिल्यामुळे रखडले आहेत.सरकारी आश्वासनही अपुरेबँकांची भीती लक्षात आल्यावर परिवहन मंत्रालयाने एक बैठक आयोजित केली. बैठकीला बँक अधिकारीदेखील उपस्थित होते.बँकांना विनंती करण्यात आली की, महामार्ग बांधणीत ज्यांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत, त्या कंपन्यांना बँकांनी कर्जपुरवठा केला, तर प्रकल्पांचे कामकाज सुरू होऊ शकेल. कर्जाच्या परतफेडीत बँकांना काही अडचणी आल्याच, तर केंद्र सरकार बँकांना मदत करील. तथापि, या आश्वासनानंतरही बँका कर्जपुरवठ्यासाठी तयार नाहीत.कर्जाच्या परतफेडीत बँकांना काही अडचणी आल्याच, तर केंद्र सरकार बँकांना मदत करील. तथापि, या आश्वासनानंतरही बँका कर्जपुरवठ्यासाठी तयार नाहीत.