शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खातेधारकांच्या ऑनलाइन फसवणुकीला बँकच जबाबदार; राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा मोठा निर्णय

By जयदीप दाभोळकर | Updated: January 7, 2021 17:24 IST

आयोगाकडून संबंधित ग्राहकाला नुकसान भरपाई देण्याचे बँकेला आदेश.

ठळक मुद्दे१२ वर्षांपूर्वीच्या तक्रारीचा आयोगानं लावला निकालहॅकरनं महिला ग्राहकाच्या खात्यातून चोरले होते ३ लाख रूपये

एकीकडे केंद्र सरकारद्वारे डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यास सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे ऑनलाइन हॅकिंग आणि फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरं जावं लागत आहे. अनेकदा ग्राहकांकडून अशा फसवणुकीची तक्रारही केली जात नाही. त्यामुळे खातेधारकांच्या खात्यातून काढण्यात आलेली रक्कम त्यांना परत करणं शक्य बँकांनाही शक्य होत नाही. ऑनलाइन फसवणुकीप्रकरणी राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडून ग्राहकांसाठी मोठी आणि चांगली बातमी आली आहे. जर हॅकरनं ग्राहकांच्या खात्यातून ऑनलाइन फसवणुकीद्वारे अथवा हॅकिंगद्वारे पैसे काढल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही बँकेची असणार आहे, असं ग्राहक आयोगाकडून सांगण्यात आलं. १२ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणाची सुनावणी करताना आयोगानं ऑनलाइन फसवणुकीसाठी बँकेला जबाबदार ठरवलं आहे. हॅकरनं बँकेतून रक्कम चोरल्याची तक्रार एका महिलेनं बँकेला केली होती. या घटनेसाठी ग्राहकानं बँकेची इलेक्ट्रॉनिक सिस्टम जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. संबंधित महिला ग्राहकाचं क्रेडिट कार्ड चोरी झाल्याचा कोणताही पुरावा बँकेनं दाखवला नाही, असं आयोगानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. तसंच  संबंधित महिला ग्राहकाला नुकसान भरपाई देण्याचे आदेशही आयोगानं दिले आहेत. ३ लाखांची नुकसान भरपाई द्याठाणे शहरात राहणाऱ्या जेसना जोस यांनी एका खासगी बँकेकडून प्रीपेड फॉरेक्स कार्ड घेतलं होतं. २००८ मध्ये त्यांच्या खात्यातून २९ वेळा ट्रान्झॅक्शन करून ३ लाख रूपये चोरण्यात आले होते. याची तक्रार जेसना यांनी ग्राहक आयोगात केली होती. यानंतर राष्ट्रीय ग्राहक आयोगानं ग्राहकाचं क्रेडिट कार्ड चोरीला गेल्याचा बँकेचा दावा नाकारला आणि जेसना यांना ३ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. याव्यतिरिक्त त्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल आणि कायदेशीर कारवाईसाठी लागलेल्या खर्चाबद्दल ८० हजार रूपये अतिरिक्त देण्याचे आदेशही दिले. 

टॅग्स :fraudधोकेबाजीbankबँकonlineऑनलाइनconsumerग्राहक