शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरणाविरोधात बँक कर्मचारी जाणार दाेन दिवस संपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 02:52 IST

महाराष्ट्र राज्यात या संघटनांचे दहा हजारांहून अधिक बँक शाखांतून काम करणारे ५० हजारांपेक्षा जास्त बँक कर्मचारी तसेच अधिकारी १५ आणि १६ मार्च रोजी संपावर जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी राज्यातील पन्नास हजारांहून अधिक बँक कर्मचारी तसेच अधिकारी दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. या क्षेत्रातील नऊ कामगार संघटनांनी येत्या १५ आणि १६ मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. तत्पूर्वी १३ मार्च रोजी दुसरा शनिवार आणि १४ मार्च रोजी रविवारी आणि नंतर सोमवार, मंगळवार संपामुळे सलग चार दिवस सरकारी बँकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर म्हणाले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्यात आले तर त्यातून मूठभर मोठ्या उद्योगांचा फायदा होईल. मात्र सामान्य माणूस बँकिंगच्या वर्तुळाबाहेर फेकला जाईल. या खासगी बँका फक्त आणि फक्त नफ्यासाठी काम करतात. यामुळे शेती, रोजगार निर्मिती, छोटा उद्योग, व्यवसाय यांना दुर्लक्षिले जाईल. खेड्यातले आणि मागास भागातले बँकिंग आकुंचित होईल.संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ बँक ऑफिसर्स, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटना सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्यात या संघटनांचे दहा हजारांहून अधिक बँक शाखांतून काम करणारे ५० हजारांपेक्षा जास्त बँक कर्मचारी तसेच अधिकारी १५ आणि १६ मार्च रोजी संपावर जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :bankबँकBank of Indiaबँक ऑफ इंडिया