शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत जमा होणाऱ्या रकमेनं गाठला 55 वर्षांतील नीचांक, नोटाबंदीचा परिणाम असल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 17:59 IST

म्युचुफल फंड आणि इतर पर्यायांकडे वाढता कल

मुंबई: नोटाबंदीनंतर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा झाली. मात्र आता उलट स्थिती पाहायला मिळतेय. खातेदार बँकांमध्ये रोकड जमा करण्यास फारसे उत्सुक नसल्याचं दिसतंय. त्यामुळे बँकांमध्ये जमा होणाऱ्या रोकड वाढीचं प्रमाण 6.7 टक्क्यांवर घसरलंय. विशेष म्हणजे हे 1963 नंतरचं सर्वात कमी प्रमाण आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, 2017-18 या आर्थिक वर्षात बँकांचा विकास दर 6.7 टक्के होता. बँकांमध्ये रोकड जमा करण्याकडे लोकांचा कल कमी झाल्याचं यातून दिसून येतंय. नोटाबंदीनंतर बँकेत रोकड जमा करण्यास ग्राहक फारसे उत्सुक नाहीत. त्याऐवजी लोक म्युचुअल फंड आणि इतर पर्यायांकडे वळले आहेत. बँकांपेक्षा म्युचुअल फंडमध्ये चांगला परतावा मिळत असल्यानं गुंतवणूकदार म्युचुअल फंड्सकडे वळताना दिसताहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. यानंतर 86 टक्के रोकड लोकांनी बँकांमध्ये जमा केली. मात्र आता नेमकी उलट परिस्थिती पाहायला मिळतेय. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकिंग व्यवस्थेत आलेला पैसा बँकिंग व्यवस्थेतून बाहेर पडलाय. काही दिवसांपूर्वी देशाच्या अनेक राज्यांमध्ये रोकड पुरवठ्याची समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी या राज्यांमध्ये अतिरिक्त रोकड पुरवठा करण्यात आला. त्यामुळे लोक बँकांमध्ये पैसे ठेवण्यास फारसे उत्सुक नसल्याचं दिसून आलं. 2017 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात बँकांमध्ये 108 कोटी रुपयांची जमा झाली होती. 2018 मध्ये हे प्रमाण 117 कोटी रुपयांवर गेलं. ही वाढ 6.7 टक्के इतकी आहे. गेल्या 55 वर्षांमधील ही सर्वात कमी वाढ आहे.  

टॅग्स :bankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र