शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

बांगलादेशींचा घुसखोरीचा प्रयत्न; हजारो नागरिक जमले बिहार सीमेवर, भारतात आश्रय देण्याची केली विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 07:13 IST

हजारो बांगलादेशी नागरिक सीमेवर जमा झाल्याचे व भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळताच बीएसएफचे कमांडंट अजय शुक्ला तसेच बिहारमधील इस्लामपूर येथील पोलिस घटनास्थळी पोहोचले.

एस. पी. सिन्हा -पाटणा/नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसक कारवाया तसेच राजकीय अस्थिरता यामुळे गांजलेले काही हजार लोक भारतालगतच्या सीमेवर जमा झाले होते. तिथून त्यांनी बिहारच्या किशनगंज जिल्ह्यात घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न गुरुवारी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हाणून पाडला. आम्हाला भारतात आश्रय द्या, अशी विनंती हे बांगलादेशी नागरिक करत आहेत.

हजारो बांगलादेशी नागरिक सीमेवर जमा झाल्याचे व भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळताच बीएसएफचे कमांडंट अजय शुक्ला तसेच बिहारमधील इस्लामपूर येथील पोलिस घटनास्थळी पोहोचले. बांगलादेशच्या हद्दीत जमा झालेल्या हजारो नागरिकांशी संवाद साधून, त्यांची समजूत काढून त्यांना परत पाठविण्यात आले. 

बांगलादेशमधील जनतेच्या हिताला भारत देतो प्राधान्यnबांगलादेशच्या जनतेच्या हिताला आम्ही प्राधान्य देतो. त्या देशात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असे भारताने गुरुवारी सांगितले. nपरराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ही माहिती दिली.

‘भारतात अस्थिरतेचा प्रयत्न सुरू’बांगलादेशमधील उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर भारतात अस्थिरता व तेथील जनतेमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे काही प्रवृत्तींचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख शांताकुमारी यांनी  केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील राष्ट्रसेविका समिती ही महिला संघटना आहे. 

‘कठीण प्रसंगात आईबरोबर असणे आवश्यक होते’ढाका : बांगलादेशमधील घटनांमध्ये झालेल्या जीवितहानीमुळे मी अतिशय दु:खी झाले, असे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कन्या सायमा वाझेद यांनी गुरुवारी सांगितले. त्या म्हणाल्या की, अतिशय कठीण प्रसंगात मी माझ्या आईसोबत नाही याचे अतिशय वाईट वाटते. सायमा वाझेद या जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाच्या विभागीय संचालक आहेत. 

मुख्यमंत्री शिंदेंची परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चामुंबई : राज्यातील विद्यार्थी, अभियंत्यांना मायदेशात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येईल, असे एस. जयशंकर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

सरकारसोबत काम करणार : अमेरिकान्यूयॉर्क : बांगलादेशात लोकशाही पुन्हा प्रस्थापित व्हावी म्हणून प्रयत्नशील आहे. त्यामुळे तिथे सत्तेवर येणाऱ्या मुहम्मद युनूस प्रमुख असलेल्या हंगामी सरकारबरोबर काम करण्यास आम्ही तयार आहोत, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले.

घटनांमागे पाकिस्तानी गुप्तहेर संघटनाढाका : बांगलादेशमध्ये लोकशाही पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसिना त्या देशात परत येतील असे त्यांचे पुत्र सजीब वाझेद जॉय यांनी गुरुवारी सांगितले. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयने केलेल्या कारवायांमुळे बांगलादेशात अशांतता निर्माण झाली, असा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशinfiltrationघुसखोरीBiharबिहार