शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"हिंदू अल्पसंख्यांकांना जीव गमवावा लागतोय अन् UN शांत आहे, हे दुर्देवी;" ISKON कडून नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 16:19 IST

ISKCON Radhakanta temple in Bangladesh : बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर हल्ला. जमावानं केली तोडफोड. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.

होळीच्या (Holi) एक दिवस आधी गुरुवारी बांगलादेशची (Bangladesh Capital) राजधानी ढाका (Dhaka) येथील इस्कॉन मंदिरावर (Iskcon Temple) हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास २०० लोकांच्या जमावाने मंदिरात घुसून तोडफोड केली. यासोबतच, याठिकाणी लूटही करण्यात आली आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. या घटनेचा इस्कॉन इंडियाकडून निषेध करण्यात आला आहे. इस्कॉन इंडियाचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी या घटनेचा निषेध करत ते दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केलं आहे.

"डोल यात्रा आणि होळी उत्सवाच्या पूर्वसंध्येला घडलेली ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांनी इस्लामोफोबियाचा सामना करण्यासाठी १५ मार्च हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर केला. हजारो असहाय्य बांगलादेशी आणि पाकिस्तानी अल्पसंख्याकांच्या दु:खाबद्दल तेच संयुक्त राष्ट्र मूक भूमिका घेत आहे याचं आम्हाला आश्चर्य वाटतं," असं राधारमण दास म्हणाले.  तर दुसरीकडे राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील परराष्ट्र मंत्रालयानं हा मुद्दा बांगलादेशकडे कठोरपणे उचलण्याची मागणी केली आहे. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक आणि प्रार्थनास्थळांप्रती ही वाढती असहिष्णुता लज्जास्पद असल्याचं त्या म्हणाल्या.  इस्कॉनचा भाग असलेल्या ढाक्यातील राधाकांता मंदिरात हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी काम करणाऱ्या एका संघटनेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या हल्ल्याचे काही फोटो आणि माहिती शेअर केली आहे. या ठिकाणी असलेले साहित्यदेखील जमावाकडून लुटण्यात आलं.

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ