शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बंगळुरुहून थेट कोप्पलू गावात, 'त्या' बापमाणसाला युवक काँग्रेसकडून मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 08:18 IST

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील कोप्पलू गावात ही घटना घडली. कोप्पालू गावात राहणाऱ्या आनंद (45) यांनी त्यांच्या दहा वर्षीय मुलाला लागणारं औषध आणण्यासाठी सायकलवरून थेट बंगळुरू गाठलं

ठळक मुद्देयुवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद यांना औषधे आणि काही प्रमाणात धान्य देऊन त्यांची मदत केली. विशेष म्हणजे मदतीसाठी हे कार्यकर्ते बंगळुरूवरुन कोप्पालू या गावी पोहोचले. 

बंगळुरू - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्येने पावणेतीन कोटींचा आकडा पार केला आहे. तर, या महामारीच्या संकटात देशभरात आत्तापर्यंत तब्बल 3,31,895 लोकांना जीव गमवावा लागला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाने सुख-दुख, हाल-अपेष्टा, संकटं अन् संकटावर मात करणारी अनेक उदाहरणे आपल्यासमोर ठेवली आहेत. अशीच एक बापलेकाची भावूक घटना समोर आली आहे. लेकाचा जीव वाचवण्यासाठी एका पित्याने सायकलवरून तब्बल 300 किमीचा प्रवास केला. याबाबतचे वृत्त माध्यमात झळकताच युवक काँग्रेसने पित्याच्या मदतीला धावून आली.   

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील कोप्पलू गावात ही घटना घडली. कोप्पालू गावात राहणाऱ्या आनंद (45) यांनी त्यांच्या दहा वर्षीय मुलाला लागणारं औषध आणण्यासाठी सायकलवरून थेट बंगळुरू गाठलं. साधारण 300 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवरुन केला आणि मुलासाठी औषध आणलं. आनंद सांगतात की, माझा मुलगा आजारी आहे. मला औषधासाठी सायकलने जावे लागले. बर्‍याच ठिकाणी औषध शोधले. पण ते उपलब्ध नव्हतं. त्यामुळे सायकलने जाण्याचा निर्णय घेतल्याचं ते सांगतात.  

कोरोना आधी दर दोन महिन्यांनी आनंद बंगळुरूला जाऊन ते औषध आणत असत. मात्र, आता लॉकडाऊनमुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळे घरामध्ये असलेलं औषध संपलं. मुलाचा जीव वाचवण्यासाठी औषध महत्त्वाचं असल्याने आनंद यांनी सायकलवरुन बंगळुरूला जाण्याचा निर्णय पक्का केला. 23 मे रोजी ते बंगळुरूला जाण्यासाठी निघाले आणि त्यानंतर 26 मे रोजी तिथून परत आले.

आनंद यांच्या प्रवासाची कथा माध्यमात आल्यानंतर युवक काँग्रेसने त्यांच्या कोप्पालू या गावी जाऊन त्यांना मदत केली आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद यांना औषधे आणि काही प्रमाणात धान्य देऊन त्यांची मदत केली. विशेष म्हणजे मदतीसाठी हे कार्यकर्ते बंगळुरूवरुन कोप्पालू या गावी पोहोचले.  कोरोना महामारीच्या संकटात माणूसकीचे मोठे दर्शनही घडले आहे. कुठे माणूसकी हरवल्याचं पाहायला मिळालं, तर कुठे माणूसकीची अने उदाहरणे ही कायमची आदर्श बनली आहे. कोरोनामुळे आपण खूप काही गमावलंय, पण कोरोनाने बरंच काही शिकवलंयही. 

मे महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना मे महिना सर्वात धोकादायक ठरला आहे. नवीन रुग्ण आणि मृतांच्या संख्येने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. फक्त मे महिन्यात कोरोनाच्या 90.3 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महिन्याच्या शेवटी थोडासा दिलासा मिळाला. मात्र तरीही एप्रिलच्या तुलनेत 30% जास्त आहे. एप्रिल महिन्यात एकूण 69.4 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तसेच मे महिन्यात जवळपास एक लाख 20 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा खूपच जास्त असून एप्रिलच्या तुलनेत अधिक आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याBengaluruबेंगळूरCyclingसायकलिंग