नवी दिल्ली : तिकिटांची एकगठ्ठा होणारी खरेदी आणि तिकिटांच्या विक्रीत शिरलेले दलाल यांना आळा घालण्यासाठी रेल्वेने आता आॅनलाइन तिकिटांसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्याचे ठरविले आहे. आधार कार्ड नसलेल्यांना यापुढे आॅनलाइन तिकिटांची खरेदीच करता येणार नाही. काही जण तिकिटांची बोगस नावाने एकगठ्ठा खरेदी करतात आणि नंतर ती जादा भावाने विकतात. दलालांनाही आळा घालणे हा आधार कार्ड सक्ती करण्याचा हेतू आहे. आयआरसीटीसीच्या साइटवर वन टाइम रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्डचा क्रमांक अनिवार्य असेल. त्यामुळे खोटी ओळख देऊन तिकीट आरक्षित करणाऱ्यांना आळा बसेल, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वे तिकिटांवर सवलत मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना येत्या १ एप्रिलपासून आपला आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. कॅशलेस तिकीट विक्रीला चालना देण्यास सहा हजार पॉइंट आॅफ सेल मशिन्स बसवण्यात येणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
रेल्वे तिकिटासाठी ‘आधार’चे बंधन
By admin | Updated: March 3, 2017 06:12 IST