शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमारच्या नागरिकांना भारतात घेऊ नका, प्रसंगी हात जोडून परत पाठवा; मणिपूर सरकारचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 11:32 IST

गेल्या काही दिवसांपासून म्यानमारमध्ये राजकीय संकट उभं राहिलं आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून म्यानमारमध्ये राजकीय संकट उभं राहिलं आहे.काही लोकांनी महिला आणि मुलांसह भारतात शिरण्याचा केला होता प्रयत्न

गेल्या काही दिवसांपासून म्यानमारमध्ये राजकीय संकट उभं ठाकलं आहे. म्यानमारमध्ये लष्करालाही नागरिकांकडून विरोध होत आहे. अशा परिस्थितीत म्यानमारमधील नागरिक भारतात शिरण्याचे प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर मणिपुर सरकारनं सीमेला लागून असलेल्या पाच जिल्ह्यांना कठोर आदेश दिले आहेत. म्यानमारच्या नागरिकांना भारतात शिरू देऊ नये, तसंच निर्वासितांसाठी शिबरं लावली जाऊ नये आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाऊ नये असे कठोर आदेश मणिपुर सरकारनं दिले आहेत.अधिकाऱ्यांनी दिलल्या माहितीनुसार मणिपुर सकरानं म्यानमार सीमेला लागून असलेल्या पाच जिल्ह्यांच्या डिप्टी कमिश्नरना म्यानमारच्या नागरिकांच्या भारतीय सीमेतील प्रवेशापासून रोखण्याचे आदेश दिले आहेत. तसंच गंभीर जखमी असलेल्या लोकांना मानवतेच्या दृष्टीकोनातून केवळ उपचार दिले जाऊ शकतात, असंही सांगण्यात आलं आहे. तसंच कोणी शरण मागितलं तर त्यांना हात जोडून परत पाठवा, असंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान. एच. न्यान प्रकाश यांनी आधार नोंदणी त्वरित थांबवली गेली पाहिजे असं म्हटलं. याशिवाय जिल्हा प्रशासनाकडून मणिपुरच्या गृह खात्यानं कारवाईचा अहवालही सोपवण्यास सांगितला आहे. महिला आणि मुलाचा भारतात शिरण्याचा प्रयत्नअधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी काही म्यानमारच्या नागरिकांनी महिला आणि मुलांसह मोरेह तमू सीमेवरुन मणिपुरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना सुरक्षा दलाने प्रवेश नाकारला. मणिपुरमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात म्यानमारमध्ये गोळ्या लागून जखमी झालेल्या तीन म्यानमारच्या नागरिकांना मणिपूरमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती आणि त्यांना इंफाळच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आलं होतं. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही माध्यमांकडून सांगण्यात आलं. 

मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे विनंतीमिझोरमचे मउख्यमंत्री जोरमथांगा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्या निर्वासितांना भारतात शरण, अन्न आणि आश्रय देण्याची विनंती केली आहे. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून यात हस्तक्षेप करण्याची मागणीही केली आहे.

टॅग्स :Myanmarम्यानमारIndiaभारतmizoram-pcमिजोरमprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी