शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात, पाच कार्याध्यक्षांचीही नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 06:27 IST

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आपल्या महाराष्ट्रातील नेतृत्वात बदल केला असून, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आली आहे. थोरात यांच्याकडे निवडणूक व रणनीती समितीची सूत्रेही सोपविली आहेत तर के. सी. पाडवी यांच्याकडे विधिमंडळ पक्षनेतेपद देण्यात आले आहे. थोरात यांच्यासमवेत नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत अवघी एक जागा काँग्रेसला जिंकता आली. त्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला होता. विधानसभा निवडणुका आपल्या नेतृत्वाखाली नकोत, असा त्यांचा आग्रह होता. शेवटी पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा थोरात यांच्याकडे सोपविली आहे.मात्र हे करताना आणखी पाच कार्याध्यक्षांचे मंडळ तयार केले आहे. त्यात राजकीय समीकरणेही साधण्याचा प्रयत्न झाला आहे. पक्षनेते विरोधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपची वाट स्वीकारली. त्यानंतर नगर जिल्ह्यातूनच प्रदेशाध्यक्षपदासाठी थोरात यांची नेमणूक करून पक्षाने नगर जिल्ह्याला महत्त्व दिले आहे. हर्षवर्धन पाटील यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते. तशी त्यांनी इच्छाही व्यक्त केली होती. विदभार्तून विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्यानंतर आता पक्षाने नितीन राऊत यांना कार्याध्यक्ष करून विदर्भात आणखी एक महत्त्वाचे पद देऊ केले आहे. त्यासोबतच यशोमती ठाकूर यांच्या रूपाने एका महिला नेत्यालाही जबाबदारी दिली आहे. गेले काही वर्षे पक्षापासून दूर असलेल्या मुजफ्फर हुसेन यांनाही पक्षाने जबाबदारी देत मुस्लिम समाजातही आपली छबी कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच पक्षाने अशोक चव्हाण यांना ‘स्ट्रॅटेजी कमिटी’चे सह-अध्यक्ष केले आहे. हर्षवर्धन पाटील यांना समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. त्याशिवाय या समितीत मिलिंद देवरा, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, सुनील केदार, शरद रणपिसे, के.सी. पाडवी, विजय वडेट्टीवार, जयवंतराव आवळे, नाना पटोले, नसीम खान आणि रामहरी रुपनवर यांचाही ‘स्ट्रॅटेजी कमिटी’मध्ये समावेश करण्यात आला आहे.

इतर समित्या व त्यांचे अध्यक्षसमन्वय समिती : सुशीलकुमार शिंदेजाहीरनामा समिती : पृथ्वीराज चव्हाणमाध्यम व संवाद समिती : राजेंद्र दर्डाप्रचार समिती : नाना पटोलेप्रसिद्धी - प्रकाशन समिती : रत्नाकर महाजननिवडणूक व्यवस्थापन समिती : शरद रणपिसे

माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेते पदावर आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली होती.  तेव्हापासूनच बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. 

 

टॅग्स :Balasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस