शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ वाढवल्या सैन्य हालचाली, टँक अन् लढाऊ विमानं केली तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 13:51 IST

पाकिस्ताननंही नियंत्रण रेषेवर हालचाली वाढवल्या आहेत.

नवी दिल्ली: दहशतवाद्यांनी 14 फेब्रुवारीला भारतीय जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला केला. त्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्याच्या 13 दिवसांनंतर भारतीय हवाई दलानंपाकिस्तानात घुसून बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तीन तळ उद्ध्वस्त केले. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार, भारताच्या कारवाईत 325 दहशतवादी आणि त्याचे ट्रेनर ठार झाले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली असून, भारतानं हवाई नियंत्रण रेषेचं उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे. त्यानंतर पाकिस्ताननंही नियंत्रण रेषेवर हालचाली वाढवल्या आहेत.राजस्थानातल्या गंगानगर जिल्ह्याला लागून असलेल्या पाकिस्तानमधील सीमारेषेत पाकिस्ताननं सैन्यबळ वाढवलं आहे. तसेच बीकानेरच्या जवळपासच्या भागातील सैन्याच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. पाकिस्ताननं सिंध भागातील तीन मोठ्या एअरबेसवरून लढाऊ विमानांची उड्डाणं वाढवली आहेत. ज्यात कराचीहून जेएफ 17 थंडर, शाहबाजमधून एफ 16 आणि न्यू छोर एअरबेसमधून एफ 16सारख्या लढाऊ विमानांनी भरारी घेतली आहे. पाकिस्तानातील नियंत्रण रेषेतील 10 किलोमीटर आतपर्यंत हवाई क्षेत्रात लढाऊ विमानं सराव करत आहेत. तसेच बहावलपूरमधील पाकिस्तानी सैन्याच्या 31 कोरच्या इन्फ्रंट्री, मॅकेनाइज्ड व आर्म्ड फोर्सेसचीही ये-जा वाढली आहे. नियंत्रण रेषेवरही वातावरण शांत आहे.पाकिस्तानी सेनेच्या 31 कोरजवळ राजस्थान आणि पंजाब भाग आहे.  बीकानेर क्षेत्रातील बहावलपूर आणि जैसलमेरपासून जवळच असलेल्या पाकिस्तानच्या सीमा रेषेमध्येही सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात येत आहे. सीमा सुरक्षा दलानं हाय अलर्ट दिला असून, नियंत्रण रेषेवर लष्कर वाढवण्यात आलं आहे. भारतीय नियंत्रण रेषेवर हेरगिरीसाठी ड्रोन आणि यूएव्ही उडवले जात आहेत. कालच भारतानं कच्छच्या क्षेत्रात पाकिस्तानचे ड्रोन पाडले होते. भारतीय गुप्तचर यंत्रणांचीही परिस्थितीवर नजर आहे. समुद्री सीमेतील बंदरगा, नवलखी आणि पायक्रिकसह पूर्ण क्षेत्रात हाय अलर्ट दिलं आहे. सीमवर्ती भागात जवान तैनात करण्यात आले आहेत. 

उत्तर भारतात अलर्ट! लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट आणि चंदीगड विमानतळ बंद 

भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून, भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने आज सकाळी हवाई हद्दीचे उल्लंघन करून हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात दक्षतेचे आदेश देण्यात आले असून, लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट आणि चंदीगड विमानतळ सर्वसामान्य प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. आज सकाळी आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करत पाकिस्तानी लष्कराची लढाऊ विमाने भारताच्या हद्दीत घुसले होते. या विमानांना भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळाल्याने या विमानांनी बॉम्ब टाकून पळ काढला. दरम्यान भारताने प्रतिहल्ला करून पाकिस्तानचे एक एफ-16 विमान लामा व्हॅलीमध्ये पाडल्याचे वृत्त आहे.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तान