शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

बिहारी नाट्य : नितीश जिंकले शक्तिपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 05:04 IST

बिहारमधील वेगवान राजकीय घडामोडीत शुक्रवारी जदयू - भाजपाच्या सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सभागृहात बहुमत सिद्ध केले. सरकारच्या बाजूने १३१ तर विरोधात १०८ मते पडली.

एस.पी. सिन्हापाटणा : बिहारमधील वेगवान राजकीय घडामोडीत शुक्रवारी जदयू - भाजपाच्या सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सभागृहात बहुमत सिद्ध केले.सरकारच्या बाजूने १३१ तर विरोधात १०८ मते पडली. बहुमतासाठी १२२ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत भाग घेताना नितीश कुमार यांनी भ्रष्टाचार आणि अन्याय करणाºयांना बिहार खपवून घेणार नाही, असे स्पष्ट करून विरोधकांचा समाचार घेतला. तर, राजदचे नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनीही नितीश कुमार यांच्यावर जोरदार पलटवार केला. भाजपासोबतच जायचे होते तर आमच्यासह सरकार का बनविले, असा सवाल करून तेजस्वीप्रसाद म्हणाले की, हे सर्व एकाच व्यक्तीच्या स्वार्थासाठी केले गेले. हिंमत असती तर नितीश कुमार यांनी मला बरखास्त करून दाखविले असते. पण तसे न करता नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेचा अपमान केला.विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत बोलताना नितीश कुमार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, वेळ येईल तसे प्रत्येक गोष्टीचे उत्तर देईन. आज जुम्मा (शुक्रवार) असल्याने सभागृहाचा वेळ वाया जाऊ नये असे आपल्याला वाटते.गुप्त मतदानाची मागणी फेटाळली२४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत नितीश कुमार यांच्याकडे ७१ सदस्य आहेत. तर, सरकारमधील मित्र पक्ष भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएकडे अपक्षांसह ६१ आमदार आहेत. यात भाजपाचे (राजग-लोजपा, रालोसपा आणि हम) ५८ आमदार आहेत. जदयूचे एक ज्येष्ठ नेते शरद यादव हे नाराज असल्याच्या चर्चा येथे सुरू असतानाच या परिस्थितीतही नितीश कुमार यांनी बहुमत सिद्ध केले आहे. लालूप्रसाद यादव यांच्या राजदने गुप्त मतदानाची मागणी केली होती. पण, विधानसभा अध्यक्ष विजय चौधरी यांनी ही मागणी फेटाळून लावली.