शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी मायावतींची माघार, निवडणूक लढणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 13:16 IST

बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्या म्हणाल्या, 'मी संसदेत कधीही निवडून जाऊ शकते. आता मागास लोकांसाठी लढायचे आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात लक्ष केंद्रित करायचे आहे. उत्तर प्रदेशात महाआघाडीला जिंकून आणणे गरजेच आहे. राजकारणात अनेक मोठे निर्णय घ्यावे लागतात. सध्या देशाचे हित आणि पार्टीची चळवळ पाहता, यंदाची निवडणूक लढणार नाही. जर निवडणुकीनंतर संधी मिळाली तर पाहता येईल.'

 

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने आघाडी केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात यंदा राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. समाजवादी पार्टी 38 आणि बहुजन समाज पार्टी 37 जागा लढवणार आहेत. तर, या आघाडीने अमेठी आणि रायबरेलीच्या जागा काँग्रेसला सोडल्या आहेत. तर मथुरा, बागपत आणि मुझफ्फरनगरच्या जागा राष्ट्रीय लोकदल पक्षाला देण्यात आल्या आहेत. 

समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्यातील जागावाटपामध्ये पश्चिम उत्तर प्रदेशमधील अधिकाधिक जागा समाजवादी पार्टीला सोडण्यात आल्या आहेत, तर पूर्व उत्तर प्रदेशमधील बहुतांश जागा मायावतींच्या बहुजन समाज पार्टीला देण्यात आल्या आहेत. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या जागावाटपामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर बसपाला झुकते माप देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील 80 पैकी 17 जागा ह्या अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित आहेत. त्यापैकी 10 जागांवर बहुजन समाज पार्टी लढणार आहे, तर समाजवादी पार्टी 7 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. तसेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर समाजवादी पक्षाला विजय मिळाला होता, अशा जागा समाजवादी पार्टीला सोडण्यात आल्या आहेत.  

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा झाल्यापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. तसेच, सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे.  

टॅग्स :mayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक