शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

चिंता सोडा! प्रवाशांनो रिकाम्या हातांनी स्थानकावर या; रेल्वे अवजड बॅगा पोहोचविणार

By हेमंत बावकर | Updated: October 22, 2020 17:10 IST

Indian Railway New Scheme : रेल्वे यासाठी कमी पैसे आकारणार आहे. कमी शुल्क घेऊन डोअर-टू-डोअर सेवा उपलब्ध केली जाणार आहे. प्रवाशाच्या घरातून त्याचे समान रेल्वे कोच तसेच रेल्वे कोचमधून प्रवाशाचे सामान त्याच्या घरी पोहोच केले जाणार आहे.

भारतीय रेल्वे पहिल्यांदाच बॅग्स ऑन व्हील ही सेवा देण्याची तयारी करत आहे. उत्तर रेल्वेच्या दिल्ली मंडळाच्या रेल्वे प्रवाशांसाठी अॅप आधारित बॅग्स ऑन व्हील सेवा सुरु करण्यात आली आहे. विभागाचे वरिष्ठ अधिकारी राजीव चौधरी यांनी सांगितले की, रेल्वे महसूल वाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. यानुसार दिल्ली विभागामध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. प्रवाशांच्या सामान त्यांच्या घरी पोहोचविण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. ही अशाप्रकारची पहिलीच सेवा आहे. 

BOW (Bags on Wheels) अॅप अँड्रॉईड आणि आयफोनवरही वापरता येणार आहे. या अॅपवरून रेल्वे प्रवासी त्यांच्या घरातून रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वे स्थानकावरून त्यांच्या घरापर्यंत बॅगा किंवा सामान पोहोचविण्याचे काम होणार आहे. यासाठी प्रवाशांना त्यांचा बुकिंगनुसार कोच क्रमांक, सीट क्रमांक आणि घराचा पत्ता द्यावा लागणार आहे. रेल्वेने निवडलेला ठेकेदार प्रवाशांचे सामान सुरक्षितपणे त्या ठिकाणी नेऊन देणार आहे. म्हणजेच या अॅपवर बुकिंग केल्यास प्रवाशांना रिकाम्या हातांनीच रेल्वे स्थानक किंवा घरी जायचे आहे. बॅगा उचलून टॅक्सीत टाकणे किंवा सांभाळण्याची कटकट वाचणार आहे. 

रेल्वे यासाठी कमी पैसे आकारणार आहे. कमी शुल्क घेऊन डोअर-टू-डोअर सेवा उपलब्ध केली जाणार आहे. प्रवाशाच्या घरातून त्याचे समान रेल्वे कोच तसेच रेल्वे कोचमधून प्रवाशाचे सामान त्याच्या घरी पोहोच केले जाणार आहे. य़ा योजनेचा फायदा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना होणार आहे. 

रेल्वे प्रवास सुरु होण्याआधी पोहोचणार महत्वाचे म्हणजे रेल्वे प्रवास सुरु होण्याआधी प्रवाशाला त्याच्या बॅगा मिळणार आहेत. यामुळे प्रवाशाला रेल्वे फलाट ओलांडताना मोठमोठ्या बॅगा उचलणे, रेल्वे पकडण्यासाठी पळापळ आदी कटकटींतून मुक्तता मिळणार आहे. सुरुवातीला ही सेवा नवी दिल्ली, दिल्ली जंक्शन, हजरत निजामुद्दीन, दिल्ली छावणी, दिल्ली सराय रौहिल्ला, गाझियाबाद आणि गुरुग्राम रेल्वे स्थानकांवर मिळणार आहे. या सेवेमुळे रेल्वेला वर्षाला अतिरिक्त 50 लाखांचा  निधी मिळणार आहे. पॅलेस ऑन व्हिल्स नंतर आता बॅग्स ऑन व्हील्स सेवाचा आनंद मिळणार आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे