शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री पुन्हा बॅकफूटवर, Tweet करत व्यक्त केली दिलगिरी; जाणून घ्या आता काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 20:21 IST

परशुराम जयंतीच्या निमित्ताने पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सोशल मिडियाच्या माध्यमाने आपल्या भक्तांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भक्तांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिले.

भोपाळ - आपल्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत आणि वादात असणारे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुन्हा एकदा बॅकफूटवर आले आहेत. हैहयवंशी क्षत्रिय समाजा संदर्भात केलेल्या एका वक्तव्यावर आता धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “गेल्या काही दिवसांत एक विषय लक्षात आला आहे. एका चर्चेदरम्यान, मी भगवान परशुरामजी आणि महाराज सहस्त्रबाहू अर्जुनजी यांच्यात झालेल्या युद्धासंदर्भात जे काही बोललो, ते पवित्र हिंदू धर्मग्रंथांतील वर्णनाच्या आधारे बोललो आहे. आपला उद्देश कोणत्याही समाजाच्या अथवा वर्गाच्या भावना दुखावण्याचा नव्हता. ना कधी असेल. कारण आपण नेहमीच सनातन एक्याच्या बाजूने राहत आलो आहोत. तरीही, जर आपल्या कुठल्याही शब्दामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही दिलगीर आहोत. आपण सर्व हिंदू एक आहोत. एकच राहू. आमची एकता हीच आमची शक्ती आहे." असे ट्विट बागेश्वर धामच्या टि्वटर हँडलवर करण्यात आले आहे.

परशुराम जयंतीच्या दिवशी करण्यात आले होते वक्तव्य -परशुराम जयंतीच्या निमित्ताने पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सोशल मिडियाच्या माध्यमाने आपल्या भक्तांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भक्तांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिले. याच वेळी, त्यांनी भगवान परशुरामा यांच्या संदर्भात सांगायला सुरुवात केली आणि म्हणाले की, "हे क्षत्रिय अचानकपणे कुठून प्रकट व्हायचे?  यासंदर्भात थोडी चर्चा करू. सहस्त्रबाहू ज्या घराण्यातील होता तो हैहय वंश होता. भगवान परशुरामांनी हैहय वंशाचा नाश करण्यासाठी हातात कुऱ्हाड घेतली. हैहय वंशाचा राजा अत्यंत दुष्ट, ऋषींवर अत्याचार करणारा आणि स्त्रियांवर बलात्कार करणारा होता." 

एवढ्यावरच बाबा बागेश्वर थांबले नाही, ते पुढे म्हणाले, दुष्टांना मार्गातून बाजूला करणे हे साधूंचे कामच आहे. यामुळे त्यांनी हैहय वंशाच्या राजांना मारायला सुरुवात केली. मात्र आपल्या शास्त्रांच्या मर्यादांचे पालन करत त्यांनी, ना कधी स्त्रियांवर आपला परशू उचलला, ना मुला-मुलींवर. त्यानी आताताई राजांचा वध केला. पण त्यांच्या मुलांना हात लावला नाही. पण जेव्हा ती मुले तरुण झाली आणि त्यांनीही अत्याचार सुरू केले, त्यांनीही आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी भगवान परशुराम यांच्यावर हल्ला केला, तेव्हा भगवान परशुरामांनी त्या त्यांचा वध केला, नंतर त्यांना मुले झाली, त्यांचाही वध केला.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामMadhya Pradeshमध्य प्रदेश