शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
14
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
15
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
16
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
17
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
18
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
19
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
20
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी

Babita Phogat: हिंदू समाज कधीही हिंसाचार करत नाही, बबिता फोगाटचं ट्विट ठरलं वादाचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 20:28 IST

अमित शाह यांनी हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरा परिसरात हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या हिंसाचाराची (Delhi Jahangirpuri Violence) सध्या सर्वत्र चर्चा आहे. या प्रकरणी आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली असून, त्यावरून राजकारणही सुरू झालं आहे. याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिल्ली हिंसाचारावर मोठं विधान केलं आहे. तर, सुवर्णपदक विजेता आणि भाजप कार्यकर्ता बबिता फोगाटनेही वादग्रस्त ट्विट केलं आहे. सध्या बबिताचं ट्विट चांगलंच चर्चेत आहे. 

अमित शाह यांनी हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत की, दंगलखोरांवर अशी कडक कारवाई करा की दिल्लीत पुन्हा अशी दंगल आणि हिंसाचार घडू नये. दिल्लीत अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशा कडक सूचना देखील अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. त्यानंतर, प्रशासनाकडून अतिक्रमणच्या नावाखाली बुलडोझर फिरविण्यात येत आहे. मात्र, या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दरम्यान, बबित फोगाटने दिल्ली हिंसाचारप्रकरणी वादग्रस्त ट्विट केलंय. 

दिल्ली हिंसाचारप्रकरणातील आरोपी अन्सार यास हरयाणातील भाजपने आम आदमी पक्षाचा नेता असल्याचे म्हटले. तर, पलटवार करताना आपने त्यास भाजप नेता असल्याचे सांगितले. हरयाणाच्या क्रीडा विभागाच्या सहसंचालक आणि भाजप नेत्या बबिता फोगाटने दिल्ली हिंसाचारप्रकरमी विशिष्ट समाजाला लक्ष्य केलं. आम आदमी पक्षानेच दिल्लीत हनुमान जयंतीला दंगल घडवल्याचा आरोप बबिताने केला आहे. आप ही हिंसा करणारी पार्टी आहे, शाहीन बाग दंगलीमुळे ही बाब स्पष्ट झाली आहे. तर, जहांगीरपुरा येथील दंगलीचा तपास पूर्ण झाल्यानंतरही हे समोर येईल, असे बबिताने म्हटले आहे.  हिंदू समाज कधी दंगल करत नाही, दंगल करणाऱ्या समाजाचं नाव सगळ्यांना माहिती आहे. त्या समाजाची ओळख सर्वांनाच आहे. उमर खालिद, शरजील इमाम, ताहिर हुसैन आणि आता अंसार, सलीम, इमाम शेख, दिलशाद, अहीद व अस्लम ही नावे आहेत. एकच समाज आणि त्याच समाजाचे हे लोक, असे ट्विट बबिताने केले आहे. या ट्विटवरुन बबितावर चांगलीच टिका होत आहे. तर, नेटीझन्सकडून तिला ट्रोल करण्यात येत आहे. 

तपास जलद गतीने करण्याचे निर्देश 

दिल्ली हिंसाचार प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दिल्लीतील हिंसाचारानंतर लगेचच अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा केली आणि योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिल्लीत झालेल्या हिंसाचारावरून देशभरात राजकरण तापलं आहे. या घटनेबाबत केंद्रातील सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्या मौनावर विरोधी पक्ष सवाल करत आहेत. 

दिल्लीत बुलडोझर, कारवाई थांबविण्याचे कोर्टाचे आदेश

उत्तर दिल्ली महापालिकेनं आज दिल्लीच्या जहांगीरपुरी येथील हिंसाचाराच्या आरोपींच्या बेकायदेशीर घरं आणि मालमत्तांवर मोठी कारवाई करत बुलडोजर चालवण्यास सुरुवात केली आहे. पण कारवाईला सुरुवात होण्याच्या काही मिनिटांत सुप्रीम कोर्टानं जहांगीरपुरीमधील एमसीडीच्या कारवाईला स्थगितीचे आदेश दिले. आता याप्रकरणावर गुरुवारी सुनावणी होणार असल्याचं कोर्टानं आदेश जारी केलेत. विशेष म्हणजे पालिकेकडून अजूनही कारवाई थांबविण्यात आलेली नाही. या कारवाईनंतर सोशल मीडियात फोटो व्हायरल झाले आहेत.

टॅग्स :delhi violenceदिल्लीBabita Kumari Phogatबबिता फोगाटAAPआपHinduहिंदू