शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

बाबासाहेबांनी ताकद दिल्याने मिळाली सत्तेची चावी! आरक्षित जागांनी बदलले देशातील राजकारणाचे चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 07:11 IST

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दलित तसेच दुर्बल लोकांची उन्नती व्हावी यासाठी आयुष्यभर संघर्ष केला.

नवी दिल्ली :

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दलित तसेच दुर्बल लोकांची उन्नती व्हावी यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. या वर्गांसाठी त्यांनी राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद केली. या गोष्टीमुळे देशातील दलित व दुर्बल घटकांच्या प्रगतीस मोठा हातभार लागला तसेच देशात विविध राज्यांत ते आता सत्तेत महत्त्वाचे घटक आहेत. अनुसूचित जाती-जमातीच्या मतदारांच्या हातात सत्तेची गुरुकिल्ली आहे, असे गेल्या अनेक निवडणुकांत दिसून आले आहे. 

लोकसभेमध्ये १३१ आरक्षित जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जातींसाठी ८४ व अनुसूचित जमातींसाठी ४७ आरक्षित जागा आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत ७७ आरक्षित जागांवर भाजपने विजय मिळविला होता. भाजपप्रणीत एनडीएने बहुमत मिळवून केंद्रातील सत्ता कायम राखली होती. २०१४ साली लोकसभा निवडणुकांत त्या सभागृहातील आरक्षित जागांपैकी भाजपने ६७ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपला केंद्रात सत्ता मिळविणे अधिक सुलभ झाले. 

त्याआधीच्या लोकसभा निवडणुकांत त्या सभागृहातील आरक्षित जागांवर काँग्रेसचे प्राबल्य होते. त्यामुळे काँग्रेसला सत्ता मिळविण्यासाठी मोठी मदत होत असे. 

असे आहे आरक्षित जागांचे गणित २०१९च्या लोकसभा निवडणुकाअनुसूचित जातीच्या    अनुसूचित जमातीच्या (एससी) संख्या        (एसटी) संख्याभाजप    ४६    भाजप    ३१ काँग्रेस    ५    काँग्रेस    ३द्रमुक    ५    बिजद    २तृणमूल काँग्रेस    ५    शिवसेना    १वायएसआरसीपी    ४    झारखंड मुक्ती मोर्चा    १एलजेपी    ३    वायएसआरसीपी    १टीआरएस    ३    राष्ट्रवादी काँग्रेस    १बिजद    ३    टीआरएस    १शिवसेना    २    अन्य    ५जदयू    २ बसप    २अन्य    ४ 

८४ आरक्षित जागा लोकसभेत एससींसाठी ४७  आरक्षित जागा लोकसभेत एसटींसाठी 

प्रादेशिक पक्षांची महत्त्वाची भूमिकाबसपसारखे प्रादेशिक पक्षदेखील आपापल्या राज्यांतील आरक्षित जागा जिंकून महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आता सर्वच राजकीय पक्षांचे अनुसूचित जाती-जमातीच्या मतदारांकडे लक्ष असते. हे मतदार ज्याच्या बाजूने कौल देतील त्या पक्षाला सत्तेचा सोपान चढणे सोपे जाते. 

सर्वाधिक आरक्षित जागा असलेली पाच राज्येअनुसूचित जातींसाठी जागा    उत्तर प्रदेश    १७     पश्चिम बंगाल    १०     आंध्र प्रदेश    ७    तामिळनाडू    ७    बिहार    ६अनुसूचित जमातींसाठी जागा    मध्य प्रदेश    ६    झारखंड    ५    ओडिशा    ५    छत्तीसगढ    ४    महाराष्ट्र    ४

२०१४च्या लोकसभा निवडणुका (सर्वाधिक आरक्षित जागा जिंकणारे पक्ष)६७ - भाजपा१२- काँग्रेस१२- तृणमूल काँग्रेस 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती