शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ही केवळ अफवा, योगपीठातील कोणताही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह नाही; बाबा रामदेव यांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 22:01 IST

Coronavirus : पतंजलीतील ८३ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचं वृत्त आलं होतं समोर

ठळक मुद्देपतंजलीतील ८३ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचं वृत्त आलं होतं समोरअफवा असल्याचं बाबा रामदेव यांचं स्पष्टीकरण

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठातील ८३ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु बाबा रामदेव यांनी हे वृत्त फेटाळलं असून ती केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. "बाहेरून आलेले काही लोकं अॅडमिशनपूर्वी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आले होते. पतंजलीतील कोणताही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह नाही," असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. "पतंजलीत कोणताही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह नाही. IPD मध्ये नवे रुग्ण आणि आचार्यकुलममध्ये काही विद्यार्थी प्रवेशासाठी आले होते. आम्ही कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांअंतर्गत त्यांची कोरोना चाचणी केली. त्यातील १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांना आम्ही मुख्य परिसरात प्रवेशाची परवानगी दिली नाही," असं बाबा रामदेव म्हणाले.पतंजली योगपीठातील ८३ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याच्या वृत्तावर बोलताना त्यांनी या अफवा आणि खोटं वृत्त असल्याचं म्हटलं. याशिवाय आपण दररोज ५ ते १० वाजेपर्यंत योग आणि आरोग्यासंबंधी लाईव्ह प्रोग्राम करत असल्याचे ते म्हणाले. "पतंजलीत कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या निव्वळ अफवा आहेत. या ठिकाणी अॅडमिशनसाठी जे लोकं आलेले त्यातील काही जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी अनेक जण आता आपापल्या घरीही गेले आहेत. आम्ही आमच्या इकडे कोविड सेंटर्स उभारली आहे. चाचण्यांशिवाय आम्ही कोणालाही प्रवेश देत नाही," असंही त्यांनी नमूद केलं.  

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाcorona virusकोरोना वायरस बातम्याpatanjaliपतंजली