शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मजुराची व्यथा, 7 दिवस पोटात अन्नाचा दाणा नसताना चालतच केला 780 किमी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 11:31 IST

कसलीही सुविधा नसताना उन्हा-तान्हात हे मजुर हजारो कि.मी पायपीट करत आपल्या घरी पोहचले. प्रवासादरम्यान अनेकजण उष्माघातानेही दगावले. तर काही कसे बसे सुखरूप घरी पोहचले.

कोरोना व्हॉयरसचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत चालला आहे. त्यामुळेच संपूर्ण देश सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. अशात अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. यात सर्वात जास्त मजुरांचे जास्त हाल झाले. रोजगारांच्या शोधात परराज्यातून विविध शहरातून स्थलातरीत झालेल्या मजुरांनी अखेर आपल्या कुटुबियांसह परतीचा प्रवास केला. कसलीही सुविधा नसताना उन्हा-तान्हात हे मजुर हजारो कि.मी पायपीट करत आपल्या घरी पोहचले. प्रवासादरम्यान अनेकजण उष्माघातानेही दगावले. तर काही कसे बसे सुखरूप घरी पोहचले. 

अशाच एका परप्रांतीय मजुरानं पानिपतहून दहा दिवस प्रवास करून आजमगड जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचला. या 10 दिवसात मजूरला फक्त 3 दिवसांचं जेवण मिळालं. 7 दिवस या मजुरानं उपाशीपोटी 780 किलोमीटरचा प्रवास केला.रामकेश गोंड असं या मजुराच नाव आहे. रामकेश हरियाणाच्या पानिपत येथे मोटार पार्ट्स कंपनीत बर्‍याच वर्षांपासून काम करत होता. लॉकडाऊनमुळे काम बंद झाले. अशात कंपनीकडून पगारही मिळाला नाही.पैस्यांचीही चणचण भासू लगाली. कंपनी मालकाला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.मात्र कोणत्याही प्रकारची मदत कंपनी मालकाकडून मिळाली नाही. जिथे प्रत्येकाने गरजुंना मदत करा असे सांगण्यात येत आहे. अनेकजण मदतीसाठी पुढे येत असताना कंपनीच्या मालकाने या मजुरांना वा-यावर सोडले. रामकेश आणि त्याचे सहकारी मोठ्या आर्थिक संकटात अडकले होते. त्यांच्यासमोर आता केवळ गावाला परत जाण्याचाच पर्याय शिल्लक होता.

शेवटी त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासदरम्यान पोलिसांनीच त्यांना मदतीतचा हात दिला. आपल्या गाडीतून त्यांना त्यांच्या गावी पोहचवले. मजुरांवर  उद्भवलेली ही परिस्थिती त्यांच्या आयुष्यभर स्मरणात राहणार हे मात्र नक्की.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या