शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेसाठी आझाद, सिन्हा, सोनोवाल? पाच राज्यांत आठ जागांसाठी होणार पोटनिवडणुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 07:10 IST

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेली  महाराष्ट्रातील जागा यापुढेही काँग्रेसकडेच राहणार आहे. 

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल हे लवकरच राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. पाच राज्यांतील राज्यसभेच्या आठ जागांकरिता पोटनिवडणुकांची तारीख येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची चिन्हे आहेत. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना महाराष्ट्र किंवा तामिळनाडूमधून पुन्हा  राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. तामिळनाडूतील राज्यसभेच्या तीन जागांपैकी द्रमुकचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी एक जागा काँग्रेसला देण्याची तयारी दाखविली आहे. त्याबाबत त्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा केली. अण्णा द्रमुकचे राज्यसभेतील खासदार आर. वैतीलिंगम व केपी मुनूस्वामी यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन आमदार बनणे पसंत केले, तर तिसरी जागा खासदार ए. मोहम्मदजान यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झाली होती. काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. ही जागा यापुढेही काँग्रेसकडेच राहाणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कठोर टीकाकार व माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांना तृणमूल काँग्रेसतर्फे राज्यसभेवर पाठविण्याचे संकेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. ममता बॅनर्जी यांना आता राष्ट्रीय राजकारणामध्येही स्वत:चा दबदबा वाढवायचा असून, त्या योजनेला अनुरूप अशा व्यक्तींनाच त्या राज्यसभेवर धाडणार आहेत. पश्चिम बंगालमधून मुकुल रॉय किंवा निवडणूक प्रचारनीतीचे जाणकार प्रशांत किशोर यांनाही ममता बॅनर्जी राज्यसभेवर निवडून आणतील अशी चर्चा आहे.

ममता बॅनर्जी यांच्या निर्णयांकडे लक्ष तृणमूलचे डेरेक ओब्रायन सध्या यशवंंत सिन्हा यांची ट्विट रिट्विट करत आहेत हेही लक्षणीय आहे. तृणमूलचे दिनेश त्रिवेदी भाजपमध्ये गेल्याने व डॉ. मानस भुयान राज्यमंत्री बनल्याने पश्चिम बंगालमधील एकूण दोन जागा रिक्त झाल्या. आसाममध्ये भाजपच्या विश्वजीत दायमरी व केरळचे जोस मणी यांनी आमदार बनण्यासाठी राज्यसभेचा राजीनामा दिला. दायमरी यांच्या जागी राज्यसभेवर सर्वानंद सोनोवाल यांना निवडून आणले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक