ऑनलाइन लोकमत
इलाहबाद, दि. ५ - समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी गुरुवारी एक खाजगी बस विनापरवाना रस्त्यावरून किमान १० मिटर चालवली.
यावेळी वाहतूक पोलीस व जिल्हाधिकारी उपस्थित होते. याघटनेनंतर आझम खान यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आपण सरकारी गाडी पेक्षा कमी वेगाने चालवल्याचे म्हटले आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजपानेते विजय बहादूर पाठक यांनी असे सांगितले की, खान यांच्यागाडीमध्ये महिला व लहान मुलं बसलेली होती. त्यांनी गाडी जवळ जवळ दुभाजकावर घातली असती असेही पाठक यांनी सांगितले. यापूर्वी आझम खान यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना त्यांची हरवलेली म्हैस शोधायच्या कामाला लावले होते.