आयुर्वेदात बीफ अनेक रोगांवर उपयुक्त असल्याचा दावा

By Admin | Updated: November 12, 2015 00:07 IST2015-11-12T00:07:45+5:302015-11-12T00:07:45+5:30

देशभरात बीफवरून (गोमांस) वाद सुरू असतानाच ज्येष्ठ वैज्ञानिक पी. एम. भार्गव यांनी आयुर्वेदातही बीफला महत्त्व असल्याचा दावा केला आहे.

In Ayurveda beef claims to be useful for many diseases | आयुर्वेदात बीफ अनेक रोगांवर उपयुक्त असल्याचा दावा

आयुर्वेदात बीफ अनेक रोगांवर उपयुक्त असल्याचा दावा

चेन्नई : देशभरात बीफवरून (गोमांस) वाद सुरू असतानाच ज्येष्ठ वैज्ञानिक पी. एम. भार्गव यांनी आयुर्वेदातही बीफला महत्त्व असल्याचा दावा केला आहे. बीफ खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो, असे भार्गव यांचे म्हणणे असून पुरातन ग्रंथांमध्येही बीफवर बंदी असल्याचा उल्लेख दिसत नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
पेशीय आणि आण्विक जीवशास्त्र केंद्राचे संस्थापक पी. एम. भार्गव यांनी चरक संहितेचा दाखला देत बीफचे महत्त्व सांगितले आहे.
जास्त शारीरिक श्रम करणारे व बदलत्या मोसमामुळे वारंवार आजारी पडणाऱ्यांसाठी बीफ उपयुक्त असते. कोरडा खोकला, अनियमित ताप आणि थकव्याने ग्रासलेल्यांसाठी बीफ फायदेशीर आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: In Ayurveda beef claims to be useful for many diseases