शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ayodhya verdict- पंतप्रधानांची घडमोडींवर करडी नजर; अमित शहा यांच्याशी सतत संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 3:25 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी शनिवारचा दिवस अत्यंत कसोटीचा राहिला.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी शनिवारचा दिवस अत्यंत कसोटीचा राहिला. अयोध्या वादावरील निर्णय व पश्चिम बंगालमधील चुलबुल वादळावर नजर ठेवणे त्यांना आवश्यक होते. त्यातच कर्तारपूर कॉरिडॉरच्या भारतीय बाजूकडील तपासणी चौकीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होते. त्यांनी या सगळ्यांचा उत्तम समन्वय साधला.तपासणी चौकीच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी सकाळीच पंजाबातील डेरा बाबा नानकला रवाना झाले. डॉ. मनमोहनसिंग आणि इतरांचा समावेश असलेल्या शीख भाविकांच्या जथ्याला रवाना करून ते सायंकाळीच दिल्लीला परतले. पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी सांगितले की, पंजाबला रवाना होण्यापूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दीर्घ चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला होता. अमृतसरला उतरल्यानंतरही ते अमित शहा यांच्याशी सातत्याने संपर्कात होते.सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या वादावर निर्णय दिल्यानंतर दुपारी १.00 वा. पंतप्रधानांनी टष्ट्वीटची एक मालिका जारी केली. लोकांचा न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास असल्याचे नमूद करतानाच त्यांनी शांतता व ऐक्याचे आवाहन त्याद्वारे केले. त्यांचे टष्ट्वीट अर्थपूर्ण होते. ‘न्याय मंदिरा’ने अनेक दशके जुन्या खटल्यावर शांततापूर्ण निर्णय दिला. रामभक्त असोत की रहीम भक्त, कोणासाठीही हा निर्णय विजय अथवा पराभव नाही, असे त्यांनी म्हटले. अमित शहा यांनीही टष्ट्वीट करून निर्णयाचे स्वागत केले.सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान दिल्लीबाहेर असताना अमित शहा यांनी त्यांना सातत्याने माहिती पुरविली. दिल्ली, मुंबई आणि उत्तर प्रदेश यासह विविध संवेदनशील जिल्ह्यांतील स्थितीची माहिती ते पंतप्रधानांना देत होते. आरएसएसच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, कलम ३७0 आणि राममंदिर यांच्या बाबतीत आपल्या अजेंड्याची अंमलबजावणी केल्याबद्दल संघ परिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कमालीचा कृतज्ञ आहे. हे दोन्ही विषय कित्येक दशके धगधगत होते. मोदी यांनी हिंमत दाखवून ते शांततेने मार्गी लावले. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे त्यासाठीच दिल्लीत तळ ठोकून होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर