शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

राममंदिर खटल्यात या 92 वर्षीय  वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वपूर्ण, जाणून घ्या त्यांच्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 10:03 IST

अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल जाहीर केला.

नवी दिल्ली - अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल जाहीर केला. या निकालानुसार अयोध्येतील वादग्रस्त भूमी ही रामजन्मभूमी असल्याचे मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने ही जमीन राम मंदिरासाठी दिली. तर सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीचे बांधकाम करण्यासाठी पाच एकर जमीन देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या खटल्याचा निकाल लागल्यानंतर राममंदिर आणि रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या एका 92 वर्षीय वकिलांचे छायाचित्र काल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या ज्येष्ठ विधिज्ञांचे नाव के. परासन असून, त्यांनी तब्बल 40 वर्षे राम मंदिराच्या बाजूने भक्कम युक्तिवाद करत या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. माजी अॅटॉर्नी जनरल म्हणून काम पाहिलेल्या परासन यांनी राम मंदिर खटल्यामध्ये दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन लढाईत हिंदू पक्षाचे वकील म्हणून काम पाहिले. त्यांनी या खटल्यासाठी शास्र, पुराणे तसेच पुरातत्व खात्याने दिलेल्या दस्तऐवज यांचा अभ्यास करून सुनावणीदरम्यान प्रभावी युक्तिवाद केला. परासरन हे या खटल्यामध्ये एवढे गुंतले होते की त्यांना अयोध्या प्रकरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण तारखा मुखोदगत आहेत. रामजन्मभूमीबाबत 40 दिवस सलग चाललेल्या सुनावणीवेळी परासरन यांनी विरोधी पक्षाचे वकील राजीव धवन यांच्या आक्रमक युक्तिवादाचा अत्यंत शांतपणे सामना केला. तसेच परासरन हे गंभीर वातावरणातही आपल्या युक्तिवादावर ठाम राहिले. 92 वर्षीय परासरन यांनी वयाचा अडसर बाजूल ठेवत सलग चाललेल्या सुनावणीत आपला पक्ष प्रभावीपणे मांडला. त्यांनी या खटल्यातील प्रत्येक पैलूचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास करून आपली बाजू स्पष्ट केली. त्यांच्या टीममध्ये पी.व्ही. योगेश्वरन, अनिरुद्ध शर्मा, श्रीधर पोट्टाराजू, आदिती दानी, अश्विन कुमार डीएस आणि भक्तिवर्धन सिंह यांचा समावेश होता. 9 ऑक्टोबर 1927 रोजी जन्मलेल्या परासरन हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेचे सभासद राहिले आहेत. तसेच 1983 ते 1989 या काळात त्यांनी देशाचे अॅटॉर्नी जनरल म्हणून काम पाहिले होते. त्यांना आतापर्यंत पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय