शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

"तारीख लिहून ठेवा आजच सांगतो की..."; अमित शाहांनी अयोध्येतील राम मंदिर केव्हा तयार होणार हे सांगून टाकलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 19:47 IST

१ जानेवारी २०२४...ही तारीख व्यवस्थित नोट करुन ठेवा, पुढच्या वर्षी याच दिवशी अयोध्येत राम मंदिर बनून तयार झालेलं असेल, हे विधान दुसरं तिसरं कुणी नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.

नवी दिल्ली-

१ जानेवारी २०२४...ही तारीख व्यवस्थित नोट करुन ठेवा, पुढच्या वर्षी याच दिवशी अयोध्येत राम मंदिर बनून तयार झालेलं असेल, हे विधान दुसरं तिसरं कुणी नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. त्रिपुरामधील एका जाहीर सभेला सबोधित करताना अमित शाह यांनी राम मंदिराच्या निर्माणाबाबतची माहिती दिली आहे. १ जानेवारी २०२४ पर्यंत अयोध्येत राम मंदिर बनून तयार झालेलं असेल असं अमित शाह म्हणाले. तसंच स्वातंत्र्यापासूनच काँग्रेसनं राम मंदिराच्या उभारणीला कोर्टात अडथळे आणले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला असंही ते पुढे म्हणाले. 

त्रिपुरातील धर्मनगर येथे जनतेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, "काँग्रेस सरकार स्वातंत्र्यापासून राम मंदिराचा मुद्दा रखडवत आली आहे. पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दिला. मंदिराचं भूमिपूजन झालं आणि तातडीनं कामालाही सुरुवात झाली", असं अमित शाह म्हणाले. 

काँग्रेसवर हल्लाबोलशाह यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "सोनिया-मनमोहन सरकारच्या काळात पाकिस्तानातून घुसखोर येऊन आमच्या जवानांना मारून निघून जात होते, पण मोदी सरकारच्या काळात शेजारील देशानं उरी आणि पुलवामामध्ये चूक केली. पण ते विसरले होते की आता भारतात मोदी सरकार आहे. मोदी सरकारनं १० दिवसांत सर्जिकल आणि हवाई हल्ले करून पाकिस्तानला घरात घुसून दहशतवाद्यांचे तुकडे केले", असं अमित शाह म्हणाले. 

काश्मीरमध्ये शांततेचे वातावरणपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे काम मोदींनी केलं आहे, असं गृहमंत्री म्हणाले. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचं काम आम्ही केलं. रक्ताचे पाट वाहतील असं काँग्रेस म्हणायची, पण काश्मीरमध्ये आज शांततेचं वातावरण निर्माण झालं आहे. याशिवाय त्रिपुरातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने ईशान्येकडील राज्यात दहशतवाद संपवून सर्वांगीण विकास केल्याचं शाह म्हणाले. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAmit Shahअमित शाह