शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

अनेकांचा हातभार; श्रीराम मंदिरासाठी 3200 कोटींचे दान, सर्वात मोठा दानवीर कोण? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 17:39 IST

Ayodhya Ram Mandir: आज अनेक शतकांच्या प्रतिक्षेनंतर रामलला मंदिरात विराजमान झाले.

Ayodhya Ram Mandir: आज अनेक शतकांच्या प्रतिक्षेनंतर रामलला अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाले. नागर शैलित बांधलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर अतिशय भव्य-दिव्य आहे. गेल्या दोन वर्षांपासून या मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू होते. यासाठी देशासह जगभरातून देणग्या आल्या होत्या. या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी 1800 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी 1100 कोटी रुपये खर्च झाले आहेत. सर्वसामान्यांपासून ते मोठ्या उद्योगपतींनी सुमारे 3200 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

सर्वात मोठी देणगी कोणी दिली?अंबानी-अदानी किंवा टाटा समूहासारख्या मोठ्या उद्योगपतींनी राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी दिली असेल, असा तुमचा विचार असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील कोट्यवधी लोकांनी, सेलिब्रिटींनी, उद्योगपतींनी, साधू-संतांनी देणग्या दिल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसर, सुरतमधील हिरे व्यापारी दिलीपकुमार व्ही लाखी यांनी राम मंदिरासाठी 101 किलो सोने(सूमारे 68 कोटी रुपये) दान केले आहे. 

राम मंदिरासाठी दुसरी सर्वात मोठी देणगी कथाकार आणि अध्यात्मिक गुरू मोरारी बापू यांनी दिली आहे. मोरारी बापू यांनी मंदिराच्या बांधकामासाठी श्री रामजन्मभूमी ट्रस्टला 18.6 कोटी रुपयांची देणगी दिली. मोरारी बापूंनी ही रक्कम लोकवर्गणीतून जमा केली. यापैकी त्यांनी भारतातून 11.30 कोटी रुपये, यूके आणि युरोपमधून 3.21 कोटी रुपये आणि अमेरिका, कॅनडामधून 4.10 कोटी रुपये जमा केले. मंदिराच्या उभारणीसाठी लोकांनी देणगी द्यावी, असे आवाहन ते आपल्या रामकथेमध्ये करायचे.

अयोध्येसाठी उद्योगपतींनी तिजोरी उघडलीडाबर इंडियाने राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी जाहीर केले आहे की, ते 17 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीतून मिळालेल्या नफ्यातील काही भाग श्री जन्मभूमी तीर्थ क्षेत्राला दान करणार आहेत. ITC श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राशी संबंधित असून, ते उद्घाटनाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत धूप दान करणार आहेत. हॅवेल्सने राममंदिर उजळून टाकण्यासाठी मोठे योगदान दिले. याशिवाय, इतर अनेक उद्योगपतींनी राम मंदिरासाठी भरभरुन दान केले आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBJPभाजपा