शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जय श्रीराम! राम मंदिरासाठी 'भीष्म प्रतिज्ञा'; तब्बल 31 वर्षांनंतर रामभक्त करणार अन्नग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 12:01 IST

7 सप्टेंबर 1992 रोजी वीरेंद्र कुमार बैठा उर्फ ​​झमेली बाबा यांनी शपथ घेतली होती की, राम मंदिर बांधलं जाईपर्यंत केवळ फळांवरच जगतील.

बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील बहादूरपूर ब्लॉकच्या खैरा गावात राहणारे वीरेंद्र कुमार बैठा उर्फ ​​झमेली बाबा 31 वर्षांनंतर अन्नग्रहण करणार आहेत. हे कारसेवक 31 वर्षांपासून फळं खाऊन आपलं जीवन जगत आहेत. जेव्हा प्रभू श्री राम आपल्या घरात प्रवेश करतील, तेव्हा ते स्वतःच्या हाताने जेवण बनवतील आणि ते अन्न खाऊन आपली तपश्चर्या पूर्ण करतील. झमेली बाबांची 31 वर्षांची तपश्चर्या 22 जानेवारीला पूर्ण होत आहे.

7 सप्टेंबर 1992 रोजी वीरेंद्र कुमार बैठा उर्फ ​​झमेली बाबा यांनी शपथ घेतली होती की, राम मंदिर बांधलं जाईपर्यंत केवळ फळांवरच जगतील. ज्या दिवशी मंदिर बांधलं जाईल आणि रामलल्ला विराजमान होतील, त्या दिवशी अन्नग्रहण करणार. आत्तापर्यंत झमेली बाबा एक छोटंस पान दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यांनी लग्नही केलं नसून समाजासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे. 

झमेली बाबा यांनी सांगितलं की, ते लहानपणापासून स्वयंसेवक आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनावरून ते दरभंगा येथून सुमारे अडीचशे कारसेवकांसह अयोध्येला रवाना झाले. सरयू नदीत स्नान केल्यानंतर अयोध्येत भव्य राम मंदिर बांधलं जावं या इच्छेने त्यांनी अन्नत्याग करण्याचा संकल्प केला. यावेळी जवळच्या स्टुडिओत फोटो काढला, तिथे पैसे दिल्यानंतर स्टुडिओ मालकाने तुमचं नाव आणि पत्ता लिहा, तो फोटो पोस्टाने पाठवतो, असं सांगितले. हा फोटो काही दिवसांनी पोस्टाने मिळाला. आजही त्यांनी तो ठेवला आहे. 

8 डिसेंबर 1992 रोजी ते आपल्या काही साथीदारांसह अयोध्येहून दरभंगा येथे पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, येथेही पोलीस त्या लोकांचा शोध घेत होते. लहेरियासराय स्थानकावरून रेल्वेमार्गे बलभद्रपूर आरएसएस कार्यालय गाठलं. यानंतर त्यांचा जीव वाचला. झमेली बाबा यांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे. त्यांना राम मंदिराचं निमंत्रण देखील मिळालं आहे. ते आता अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाची पूजा करणार आहेत.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या