शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या प्रकरण: दोन आठवड्यात प्रगती अहवाल द्या; सर्वोच्च न्यायालयाचे मध्यस्थी समितीला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 11:24 IST

अयोध्या जमीन वाद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना

नवी दिल्ली: अयोध्या जमीन वाद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मध्यस्थी समितीला दोन आठवड्यांत प्रगती अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. २५ जुलैपर्यंत प्रगती अहवाल द्या, अशी सूचना न्यायालयाकडून करण्यात आली आहे. अयोध्या जमीन वाद प्रकरणात मध्यस्थी समितीचं काम अतिशय संथ गतीनं सुरू असल्यानं न्यायालयानं जलद सुनावणी घ्यावी, अशी मागणी हिंदू पक्षकार गोपाल सिंह विशारद यांनी याचिकेच्या माध्यमातून केली होती. त्यावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या मध्यस्थांच्या समितीच्या कामात विशेष प्रगती नसल्याचा आक्षेप सिंह यांनी घेतला होता. त्यांच्या वतीनं वरिष्ठ वकील के. परासरन यांनी बाजू मांडली. मध्यस्थांच्या कामात कोणतीही प्रगती नसल्यानं न्यायालयानं या प्रकरणी सुनावणीची तारीख द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर मुस्लिम पक्षकारांच्या वतीनं डॉ. राजीव धवन यांनी प्रतिवाद केला. मध्यस्थांच्या समितीवर टीका करायची ही वेळ नाही, असं धवन म्हणाले. दोन्ही पक्षकारांनी बाजू मांडल्यावर न्यायालयानं आपली भूमिका स्पष्ट केली. 'या प्रकरणी आपण मध्यस्थांच्या समितीची स्थापना केलेली आहे. त्यांच्या अहवालाची वाट पाहावी लागेल. आधी त्यांना त्यांचा अहवाल सादर करू दे,' असं न्यायालयानं म्हटलं. मध्यस्थी समितीनं २५ जुलैला अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयानं दिले. त्याआधी न्यायालयानं या समितीला १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. माजी न्यायमूर्ती एफ. एम. कलीफुल्ला या समितीचे अध्यक्ष असून आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर आणि वरिष्ठ अधिवक्ते श्रीराम पंचू सदस्य आहेत. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय