शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराप्रमाणे दिसणार अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळ; विमानसेवा कधी सुरू होणार..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:40 IST

Ayodhya International Airport: भाविकांना अयोध्येत येता यावे, यासाठी राम मंदिरासोबतच विमानतळाचे कामही वेगाने सुरू आहे.

अयोध्या: अयोध्येतील मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम विमानतळाचे बांधकाम वेगाने सुरू झाले आहे. अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लूक राम मंदिरासारखा बांधण्यात येत आहे. सध्या विमानतळाचे 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. 2023 मध्ये विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास आहे.

अयोध्येत सर्वत्र राम मंदिराची प्रतिकृतीराम मंदिरासोबतच विमानतळाचे बांधकामही पूर्ण करण्यात येणार आहे. भाविकांना विमानामार्गे अयोध्येत येता यावे, यासाठी मंदिरासोबत याचे काम वेगाने केले जात आहे. विशेष म्हणजे, विमानतळाच्या टर्मिनलचे स्वरुप राम मंदिरासारखेच बांधण्यात येणार आहे. भाविक अयोध्या विमानतळावर पोहोचल्यावर त्यांना आपण रामाच्या नगरीत असल्याचा भास होईल. विमानतळ असो, रेल्वे स्थानक असो की आंतरराष्ट्रीय बसस्थानक, प्रत्येकाचे रूप राममंदिराच्या रूपात साकारले जात आहे.

विमानतळावर उतरताच राम मंदिराचे दर्शन मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी 317.855 एकर जमीन यापूर्वीच भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या जमिनीवर पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. 2023 मध्ये धावपट्टी आणि त्याच्याशी संबंधित इमारतीचे काम पूर्ण होईल. अयोध्येतील श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम राममंदिराच्या धर्तीवर केले जात आहे. दगडांचा वापर असो की त्यावर केलेले कोरीव काम असो, सर्व काही तसेच असेल. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याairplaneविमान