शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या : पहिल्यांदाच रामलल्लाच्या आरतीत भक्तांना सहभागी होण्याची परवानगी

By जयदीप दाभोळकर | Updated: January 5, 2021 14:44 IST

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून भक्तांसाठी जारी करण्यात येणार पास, इतिहासात पहिल्यांदाच भक्तांना आरतीत सहभागी होता येणार

ठळक मुद्देइतिहासात पहिल्यांदाच भक्तांना आरतीत सहभागी होता येणारकोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसाला ३० पास देण्यात येणार

रामजन्मभूमी परिसरातील मंदिरात विराजमान असलेल्या प्रभू श्रीरामाच्या आरतीत सहभागी होण्यासाठी भक्तांनाही परवानगी देण्यात आली आहे. सायंकाळी होणाऱ्या आरतीत सहभागी होणाऱ्या भक्तांना आता रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पास देण्यात येणार आहे. सध्या ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाची मूर्ती विराजमान आहे त्या ठिकाणी मर्यादित जागा उपलब्ध आहे. म्हणूनच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आरतीसाठी दररोज ३० भक्तांना सहभागी होता येणार आहे. अयोध्येच्या इतिहासात पहिल्यांदाच भक्तांना आरतीत सहभागी होता येणार आहे.आरतीत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टद्वारे पासेस देण्यात येणार आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दररोज ३० भक्तांना पासेस देण्यात येतील. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या तत्त्वावर हे पासेस दिले जातील. प्रभू श्रीरामाच्या आरतीसाठी भाविकांना संध्याकाळी ६ वाजता रामजन्मभूमीचं प्रवेशद्वार रंगमहल बॅरिअरकडे पोहोचावं लागेल. त्यानंतर प्रशासनाच्या नियमांनुसार त्यांना आरतीसाठी पासेस देण्यात येतील. तसंच या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यासही मनाई असेल. याव्यतिरिक्त कॅमेरा आणि मोबाईल फोनही नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसंच पासेससाठी भाविकांकडून कोणत्याही प्रकारचं शुक्ल आकारलं जाणार नाही. रामजन्मभूमी येथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्व त्या उपययोजना करण्यात आल्या आहेत. तसंच भाविकांच्या सोयीसाठीही छत्र उभारणं, पिण्याचं पाणी अशा सोयींचीदेखील काळजी घेण्यात आली आहे. संतांच्या आवाहनानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं प्रभू श्रीरामाच्या आरतीत आता भाविकांनाही सहभागी होण्याची संधी दिली आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश