शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 20:24 IST

Ayodhya Deepotsav 2024: दीपोत्सवात विक्रमी 25 लाख 12 हजार 585 दिवे लावून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे.

Ayodhya Deepotsav 2024: भगवान श्रीरामाची जन्मभूमी अयोध्येत दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. शरयूच्या 55 घाटांवर एकाच वेळी 25 लाख दिव्यांची रोषणाई करुन 'राम की पाडी' उजळून निघाली आहे. या दीपोत्सवासह एक मोठा विक्रम झाला आहे. दीपोत्सवात विक्रमी 25 लाख 12 हजार 585 दिवे लावून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. हे अनोखे दृष्य पाहण्यासाठी शरयूच्या दोन्ही बाजूला हजारो लोक जमले होते. 

विशेष म्हणजे, तब्बल 500 वर्षांनंतर पहिल्यांदाच अयोध्येतील लोक रामललाच्या उपस्थितीत दिवाळी साजरी करत आहेत. प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राम की पाडीसह 55 घाट 25 लाख दिव्यांनी उजळून निघाले. एवढंच नाही, तर 1100 अर्चकांनी शरयू नदीच्या तीरावर महाआरती केली. यावेळी हजारो भाविक येथे उपस्थित राहून दीपोत्सवाचा आनंद लुटत होते.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंददरम्यान, आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दोन विक्रमांची नोंद झाली आहे. पहिला म्हणजे, शरयूच्या तीरावर 1 हजार 121 जणांनी एकत्रितपणे आरती केली. दुसरा म्हणजे, 25 लाख 12 हजार 585 दिवे लावण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय पर्यटन-सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि योगी सरकारचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ मंत्री या क्षणाचे साक्षीदार होते.

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAyodhyaअयोध्याDiwaliदिवाळी 2024yogi adityanathयोगी आदित्यनाथ